Tarun Bharat

देवगिरी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Advertisements

काकती पोलिसांची कारवाई, सात जणांना अटक

प्रतिनिधी / बेळगाव

देवगिरी, ता. बेळगाव येथे अंदर-बाहर जुगार खेळणाऱया सात जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. काकती पोलिसांनी ही कारवाई केली असून पोलिसांनी छापा टाकताच चौघे जण तेथून फरारी झाले आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी सोलार लाईटच्या उजेडात जुगार खेळणाऱया सात जणांना अटक केली. त्यांच्याजवळून 22 हजार 650 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

रामा भिमशी कुंबरगी (वय 30), यल्लेश यल्लाप्पा कुशे (वय 23) दोघेही राहणार देवगिरी, शिवाप्पा बापाण्णा नाईक (वय 32), सिदराई बाळाप्पा नाईक (वय 31) दोघेही रा. निंग्यानट्टी, सिदराई निंगाप्पा हलभावी (वय 42) रा. मुत्यानट्टी, जोतिबा कल्लाप्पा कुमाण्णाचे (वय 27), कऱयाप्पा शाम गिरण्णावर (वय 42) दोघेही राहणार निंग्यानट्टी अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत.

पोलिसांनी छापा टाकताच जोमा कल्लाप्पा पाटील, रा. देवगिरी, दशरथ लक्ष्मण गिरण्णावर, विशाल जोडप्पा कुमाण्णाचे, दोघेही राहणार बंबरगा, सोमा यल्लाप्पा कुमाण्णाचे, रा. केदनूर हे चौघे जण फरारी झाले आहेत. सर्व अकरा जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

कर्नाटक: अंध आणि कर्णबधिर सरकार असंवेदनशील: कुमारस्वामी

Abhijeet Shinde

पोलिसाच्या सतर्कतेमुळे बस स्थानकावर तिघांना पकडले

Patil_p

रामनगर ग्रा. पं. अध्यक्षपदी रोहिणी भोसले

Amit Kulkarni

वनटाईम सेटलमेंटबाबत मनपा उदासीन

Amit Kulkarni

शेतकऱयांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱयांनी घेतली बैठक

Patil_p

बेळगाव जिह्यात आणखी 120 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!