Tarun Bharat

देवसहायम यांना मिळाले संतपद

पोपकडून प्रदान : 18 व्या शतकात स्वीकारला होता ख्रिश्चन धर्म

वृत्तसंस्था / व्हॅटिकन सिटी

Advertisements

18 व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे हिंदूधर्मीय देवसहायम पिल्लई यांना जन्माच्या 300 वर्षांनी संतपद मिळाले आहे. व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांना संत उपाधी दिली आहे. ख्रिश्चन धर्मातील संतपद मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत.

देवसहायम पिल्लईंचा जन्म 23 एप्रिल 1712 रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये एका हिंदू नायर कुटुंबात झाला होता. कन्याकुमारी तेव्हा त्रावणकोर साम्राज्याचा हिस्सा होते. त्यांचे वडिल मंदिरात पुजारी होते. देवसहायम यांना संस्कृत, तमिळ आणि मल्याळी भाषा अवगत हीत.

1741 मध्ये डच नौदलाचा कमांडर कॅप्टन यूस्टाचियस डी लैनॉयला डच ईस्ट इंडिया कंपनीकडून त्रावणकोरच्या नियंत्रणातील एका बंदरावर कब्जा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्रावणकोरच्या सैन्याने युद्धात डच कमांडरच्या नेतृत्वाखालील सैन्यतुकडीला पराभूत केले. कमांडर आणि त्यांच्या सैनिकांना कैदेत टाकण्यात आले आहे. काही काळानंतर राजाकडून माफी मिळाल्यावर डच कमांडर त्रावणकोर सैन्याचा सेनापती झाला, ज्याने अनेक युद्धांमध्ये विजय मिळवून अनेक भागांना त्रावणकोरमध्ये जोडले होते. याचदरम्यान डच कमांडर अन् देवसहायम यांची भेट अन् संवाद होऊ लागला. डच कमांडरनेच त्यांना ख्रिश्चन धर्मासंबंधी सांगितले आणि 1745 मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

बदलले नाव अन् धर्म

देवसहायम यांचे नाव नीलकंठ पिल्लई होते. बाप्टिजमनंतर त्यांचे नाव बदलून लेजारुस झाले. लेजारुसचा अर्थ देवाची मदत असा होतो. तमिळ आणि मल्याळी भाषांमध्ये याचा अनुवाद देवसहायम होतो. याच नावाने त्यांना अधिक ओळख मिळाली.

गोळय़ा घालून हत्या

त्रावणकोर राज्य या धर्मांतराच्या विरोधात होते आणि देवसहायम यांना याचा प्रकोप झेलावा लागला. त्यांना पदावरून हटविण्यात आले आणि मग तुरुंगात डांबण्यात आले. 14 जानेवारी 1752 रोजी गोळय़ा घालून ठार करण्यात आल्याचा दावा व्हॅटिकनने एका पत्रकात केला होता.

Related Stories

अफगाणिस्तानच्या निर्वासित महिला नेत्या संयुक्त राष्ट्राला प्रथमच देणार भेट

Abhijeet Shinde

आणीबाणी हटविली

Patil_p

तालिबान- पाकिस्तानात सीमेवरुन पुन्हा रणकंदन

Omkar B

अमेरिकन एअर फोर्सचे एफ-15 सी फायटर विमान समुद्रात कोसळले

datta jadhav

कोरोनाचा टी-पेशींवर पडतो प्रभाव

Patil_p

कोरोनाच्या भीतीने लोकांना समजाविले सकस आहाराचे महत्त्व

Patil_p
error: Content is protected !!