Tarun Bharat

‘देवाच्या प्रकोपा’च्या भीतीने गुन्हा केला मान्य

मंगळूरमध्ये मंदिरात फेकल्या होत्या आक्षेपार्ह वस्तू

तीन आरोपींपैकी एकाचा आकस्मिक मृत्यू

दक्षिण कर्नाटकातील मंगळूरमध्ये पोलिसांनी एका मंदिरात आक्षेपार्ह वस्तू फेकण्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी स्वतः पोलिसांसमोर जात गुन्हा मान्य केला आहे. पण त्यांचे हे हृदयपरिवर्तन अचानक घडलेले नाही. गुन्हय़ात सामील तीन सहकाऱयांपैकी एक अचानक आजारी पडणे आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने हे घडून आले आहे. मृत्यूपूर्वी आरोपीने स्वतःच्या मित्रांना ‘देवाच्या प्रकोपा’पासून वाचण्यासाठी गुन्हा मान्य करण्याचा सल्ला दिला होता.

गुन्हा केल्यावर दोन्ही आरोपींची प्रकृतीही बिघडू लागली होती, यातून त्यांना स्वतःच्या गुन्हय़ाची जाणीव झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मंगळूरचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांच्यानुसार दोन्ही आरोपी एका सहकाऱयाच्या मृत्यूमुळे घाबरले होते. त्याची प्रकृती बिघडणे आणि त्याला मृत्यूपंथावर पाहून दोघांनाही ‘देवाच्या प्रकोपा’मुळे हे घडत असल्याचे वाटू लागले होते.

आजारी आरोपीने दोन्ही सहकाऱयांना गुन्हा मान्य करण्यास सांगितले होते. याचमुळे मृत्यूच्या भीतीतून दोन्ही आरोपी सर्वप्रथम मंदिराच्या पुजाऱयाकडे पोहोचले, त्यांच्यासमोर त्यांनी स्वतःचा गुन्हा मान्य केला आहे. त्यानंतर मंदिर समितीने याची कल्पना पोलिसांना दिली. या दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोरही स्वतःचा गुन्हा मान्य केला आहे.

Related Stories

जयराम रमेश यांचा माफीनामा

Patil_p

लॉकडाऊनमध्ये मासेमारीला केंद्र सरकारची परवानगी

prashant_c

बीपीसीएल : सिलिंडरधारकांना मिळणार दिलासा

Patil_p

अयोध्या : राममंदिराच्या 2 हजार फूट खाली ठेवणार ‘टाइम कॅप्सूल’

datta jadhav

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा एकदा वाढ

Patil_p

पियूष गोयल यांनी मागे घेतले विधान

Amit Kulkarni