Tarun Bharat

देवाबाग येथे पार्क केलेल्या बुलेटला आग दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Advertisements

प्रतिनिधी / काणकोण

देवाबाग येथील जंक्शनजवळ पार्क करून ठेवलेल्या रोहित रामदास फळदेसाई यांच्या मालकीच्या जीए. डी. 1238 नंबरच्या रॉयल एनफिल्ड बुलेटला पहाटे 1च्या दरम्यान आग लावण्याचा प्रकार घडला असून यात आपले दोन लाख रू. चे नुकसान झाल्याची तक्रार श्रा.r फळदेसाई यानी काणकोणच्या पोलिस स्थानकावर केली असून या प्रकरणी संशयित म्हणून जीतू अल्लाई 27 वर्षे भाटपाल आणि ज्युलियस फर्नाडिस 29 वर्षे आगोंदा या दोन व्यक्ती विरूद्ध भा. दं. वि. 438, 336 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघानाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यानी दिली आहे.

आपण नेहमीच सदर जागी आपली मोटार सायकल पार्क करून ठेवून खेळायला जात असतो. आपले आणि सदर संशयित व्यक्तीविरूद्ध कसलेच वैमनस्य नसून या प्रकाराने आपण गोंधळुन गेलो असल्याची प्रतिक्रिया रोहित फळदेसाई यांनी व्यक्त केली. पार्क करून ठेवल्या जाणाऱया दुचाकीला आग लावण्याच्या प्रकाराने संतप्त झालेल्या 100 पेक्षा अधिक व्यक्तींनी काणकोण पोलिस स्थानकावर धाव घेऊन अशा प्रकारावर आळा घालण्याची मागणी केली. काही व्यक्ती रात्रभर रस्त्यावरून फिरत असतात. त्यांची चौकशी तसेच विचारपूस पोलिसांनी करायला हवी, ज्या संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांचा मागचा इतिहास पडताळून पहावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

सद्या देवाबाग, चार रस्ता परिसर अत्यंत धोक्याचा बनलेला असून चार रस्ता आणि देवाबाग जंक्शन जवळ रात्रभर पोलिस पहारा ठेवण्यात यावा, या रस्त्यावरून मध्यरात्री जी वाहने येतात आणि जातात त्याची नोंद व्हावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

आज केवळ दुचाकीला आग लावण्याचा प्रकार घडला उद्या एखाद्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला तर वेळ निघून गेलेली असेल असे मत या भागातील काही ज्येष्ठ नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे. चार रस्ता, देवाबाग येथील एका आस्थापनामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले असून त्या सीसीटीव्ही वरील फुटेजमुळे संशयित सापडले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिली. ज्या वाहनाने संशयित रात्रभर फिरत असतात ते वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काणकोणच्या पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतल्यानंतर उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

तरंगत्या जेटीसोबतच सोलर फेरीबोटीचे उद्घाटन

Amit Kulkarni

चोपडेतील खाजन पूर्ववत करा

Amit Kulkarni

पंचायत संचालकातर्फे निविदा काढल्यास बार्देशातील सरपंचाचा जोरदार विरोध

Patil_p

विवेक नाईक यांना ‘कौशल्यचार्य 2020’ पुरस्कार

Patil_p

मोती डोंगर कंन्टेमेंन्ट झोन

Patil_p

सत्तरी तालुक्मयात पारंपारिक वटपौर्णिमेचा सोहळा उत्साहात साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!