Tarun Bharat

देवालयांमध्ये ‘आत्मस्थैर्य’ योजना राबविण्याची मागणी

कर्नाटक राज्य धार्मिक परिषदेचे सदस्य 9 एप्रिल रोजी सरकारशी चर्चा करणार

प्रतिनिधी / बेळगाव

देवालयांमध्ये आता महिला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. वर्षभरापूर्वी त्याबाबत निर्णय झाला असला तरी लॉकडाऊनमुळे तो स्थगित करण्यात आला होता. आता मात्र लवकरच देवालयांचा उपयोग महिला संरक्षणासाठी करून घेण्यात येणार आहे. मात्र प्रामुख्याने हा उपक्रम ग्रामीण भागामध्येच राबविण्यात येणार आहे.

कर्नाटक राज्य धार्मिक परिषदेचे सदस्य दि. 9 एप्रिल रोजी सरकारची भेट घेणार असून त्यावेळी वर्षभरापूर्वी दिलेल्या या प्रस्तावाचा पुनर्विचार करून तो अंमलात आणावा, अशी मागणी करणार आहेत. देवालयांचे आवार विस्तीर्ण असते. याच ठिकाणी मुली आणि महिलांना कराटे व अन्य संरक्षणाचे धडे द्यावेत, तसेच संगीताचे वर्गही चालवावेत, अशी परिषदेच्या सदस्यांची मागणी आहे.

राज्यात 34 हजार देवालये

राज्यात एकूण 34 हजार देवालये आहेत, जी धर्मादाय खात्याकडून चालविली जातात. यापैकी 175 देवालये अ वर्गात मोडतात. कारण त्यांचे वार्षिक उत्पन्न 25 लाखांच्या वर आहे. 158 देवालये ब वर्गात आहेत. ज्यांचे उत्पन्न 25 लाख आहे. अन्य सर्व देवालये क श्रेणीत मोडत असून त्यांचे उत्पन्न 25 लाखांच्या आत आहे. याशिवाय हजारो देवालये खासगी विश्वस्त संस्था किंवा व्यक्तींकडून चालविली जातात.

देवालयांमध्ये आत्मस्थैर्य ही योजना वर्षभरापूर्वीच लागू होणार होती. परंतु ती लॉकडाऊनमुळे अंमलात आली नाही. आता पुन्हा एकदा हा प्रस्ताव चर्चेत आला असून त्याबाबत आपण अधिकाऱयांशी चर्चा करणार असून अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेणार असल्याचे धर्मादाय मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले.

प्रारंभी जी देवालये आर्थिकदृष्टय़ा बळकट आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. तसेच याठिकाणी स्वसंरक्षण धडे देण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जाईल. महिलांचे घरातील काम व मुलींचे शिक्षण यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सायंकाळी हे वर्ग चालविले जातील. सध्या सरकारची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून म्हणजेच सामाजिक जबाबदारी निधीमधून यासाठी अर्थसाहाय्य करावे, अशी अपेक्षा आहे.

या योजनेला गती मिळण्यासाठी सरकारला ग्रामीण भागातील पालक आणि ज्ये÷ मंडळींना विश्वासात घेऊन महिला आणि मुलींना या वर्गाला पाठविण्यासाठी मनधरणी करावी लागणार आहे.

Related Stories

आता रात्रीच्या प्रवासासाठी धावताहेत वातानुकूलित बसेस

Patil_p

जनावरांच्या अंगावर मच्छरदाणीचा वापर

Amit Kulkarni

अखेर बायपासवरील यंत्रसामग्री हलविली

Amit Kulkarni

जिल्हय़ात शुक्रवारी 53 नवे रुग्ण : 51 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

हेस्कॉमकडून शहरातील 306 इमारतींना नोटिसा

Patil_p

खानापूरची माती म्हणजे शिंपल्यातला मोती

Omkar B