Tarun Bharat

देवींच्या मूर्तींचे विसर्जन वेळेत करा

पोलीस अधिकाऱयांचे बैठकीत आवाहन

प्रतिनिधी /बेळगाव

दसरोत्सवानिमित्त वेगवेगळय़ा ठिकाणी दुर्गादेवी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शुक्रवारी विजयादशमी दिवशी वेळेत मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांनी केले आहे. गुरुवारी मार्केट पोलीस स्थानकात झालेल्या दसरा उत्सव मंडळ पदाधिकाऱयांच्या बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले. एका मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दहा ठिकाणी दुर्गादेवी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कोरोना महामारीचा फैलाव कमी होत असला तरी मिरवणुकीला सरकारने परवानगी दिली नाही. मानाच्या पालखीला मुभा देण्यात आली आहे. दुपारी 2 पर्यंत पालखी उत्सव करावेत, सायंकाळी 5 पर्यंत मूर्तींचे विसर्जन पूर्ण करण्याचे आवाहनही पोलीस अधिकाऱयांनी केले. शिवाजीनगर, फुलबाग गल्ली, मेणसी गल्ली, चव्हाट गल्ली, भुई गल्ली, महाद्वार रोडसह वेगवेगळय़ा ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते. डॉल्बीवरील बंदी कायम आहे. दसरा साजरा करताना कोविड नियमावलींचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Stories

कुर्ली-आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ मंदिरास रमेश कत्ती यांची भेट

Omkar B

बँकांमधून रोख रक्कम काढणाऱयांची संख्या वाढली

Amit Kulkarni

लोकप्रिय लेखक नव्या वाचकांची निर्मिती करतो

Amit Kulkarni

काँक्रिटीकरणामुळे शहराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारे बंद

Patil_p

बापट गल्लीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

भंडारी, चिटणीस, ज्ञानमंदिर, सेंट जॉन संघांना विजेतेपद

Amit Kulkarni