Tarun Bharat

देवेंदर ‘नासका’ म्हणून…

 

जम्मू-काश्मीरमधील देविंदर सिंग या पोलीसदलात उच्चपदावर असणाऱया अधिकाऱयाला लष्करे तैय्यबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांसोबत रंगेहाथ पकडला जाणे ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे.  आजवर अनेकदा आरोप झालेल्या देविंदरला सातत्याने पदोन्नती कशी मिळत गेली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. एनआयए या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करेलच; पण देविंदरच्या उदाहरणावरुन संपूर्ण जम्मू-काश्मीर पोलिसांच्या  कर्तव्यदक्षतेवर, प्रामाणिकपणावर, राष्ट्रनि÷sवरच शंका उपस्थित करणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. प्रामाणिक पोलिसांचे मनोधैर्य यातून खच्ची होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे एक आंबा नासला म्हणून पेटी खराब आहे, असा न्याय लावला जाऊ नये. याकडे राष्ट्रीय स़ुरक्षेच्या दृष्टीने पाहिले जावे इतकेच !

जम्मू-काश्मीरमध्ये वरि÷ पोलीस अधिकारी असणाऱया देवेंदर सिंग यांना अलीकडेच लष्कर-ए-तय्यबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या नवीद बाबा आणि अल्ताफ या दोन कुख्यात दहशतवाद्यांसह पकडण्यात आले.  दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरातील वीर बाजारमध्ये एका कारमध्ये हे तिघे होते. साहजिकच, या घटनेने संपूर्ण देशामध्ये खळबळ माजली आहे. कारण देवेंदर सिंह यांच्यासारखा पोलीसदलातील वरि÷ अधिकारी, ज्याच्यावर 20 पोलिसांच्या हत्येचा आरोप आहे, ज्याच्या हाताखाली 40 दहशतवादी काम करतात, अशा दहशतवाद्यांबरोबर रंगेहाथ पकडला जाणे ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बाब आहे. अटकेनंतर देवेंदरला ‘दहशतवादी’ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ‘नॅशनल इन्व्हिस्टेगेशन एजन्सी’ (एनआयए) करते आहे.  गुप्तहेर संघटनाही त्याची चौकशी करताहेत. त्यातून या गंभीर घटनेशी संबंधित अनेक गोष्टी उघड होणार आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कलम 35 ए आणि कलम 370 हटवल्यानंतर आणि जम्मू -काश्मीरची पुनर्रचना केल्यानंतर पाकिस्तान सातत्याने तिथे अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून अनेक दहशतवादी  काश्मीरमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. काश्मीरमधील स्थानिक लोकांची माथी भडकवून, त्यांना मूलतत्ववादाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातून दहशतवादी निर्माण करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यामुळे जम्मू -काश्मीरची एकंदर परिस्थिती तणावपूर्ण असताना आणि अक्षरशः डोळय़ात तेल घालून सुरक्षायंत्रणा काश्मीरमध्ये जिवाची बाजी लावत असताना वरि÷ पातळीवरचा एक पोलीस अधिकारी दहशतवाद्यांबरोबर पकडला जाणे ही गोष्ट नक्कीच सर्वसाधारण म्हणता येणार नाही. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असा प्रकार आहे. त्यामुळेच याबाबत राजकारण केले जाणे आणि पक्षीय संबंधांतून चिखलफेक होणे उचित ठरणारे नाही. त्याचबरोबर एक अधिकारी पकडला गेला म्हणून काश्मीरमधील सर्वच पोलीस अधिकाऱयांच्या विश्वासार्हतेवर शंका घेणे, जम्मू -काश्मीरची पोलीसयंत्रणा दहशतवाद्यांशी हातमिळवणी करणारी आहे किंवा सर्वच अधिकारी यामध्ये गुंतलेले असण्याची शक्मयता आहे, असे अनुमान वर्तवणे चुकीचे ठरेल. अटक करण्यात आलेल्या देवेंदर सिंह यांची एनआयएकडून सविस्तर चौकशी होणार आहे. एनआयए या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. या प्रकरणाचे कंगोरे शोधून स्पष्ट मांडण्यात येणार आहेत. तोपर्यंत वाट न पाहता  चौकशी होण्यापूर्वीच  त्यावरून राजकारण होणे हे नक्कीच दुर्दैवी आहे. हा सर्व प्ा्रखखश्न देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्यामुळे याकडे अत्यंत सावधपणे पाहणे गरजेचे आहे. एका देवेंदर सिंह सारख्या पोलीस अधिकाऱयामुळे सगळेच वरि÷ अधिकारी यात सामील असतील आणि हे खूप मोठे जाळे असेल, या सारखी वक्तव्ये संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी घातक असतील.

आजच्या घडीला जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे लष्कर तैनात आहे. त्या माध्यमातून दहशतवादावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीसही दहशतवादाचे नियंत्रण करण्यात किंवा दहशतवादाचा मुकाबला करण्यात गेल्या तीस वर्षांपासून जे योगदान देत आहेत, तेही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतुलनीय आहे. गेल्या 30 वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा मुकाबला करताना तिथल्या 1550 पोलिसांना वीरमरण प्राप्त झाले आहे. आपल्याकडे जेव्हा पोलिसांना वीरमरण मिळते तेव्हा त्याला राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांमधून फार प्रसिद्धि दिली जात नाही. लष्करातील जवान शहीद झाल्यावर जितकी चर्चा होते, तशी चर्चा स्थानिक पोलीस मारले गेल्यास होत नाही. त्यामुळे अनेकांना माहीत नसेल, पण 2018-2019 या एकाच वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 26 पोलीस दहशतावाद्यांशी सामना करताना शहीद झाले.

एक महत्त्वाची गोष्ट अशी की, पोलिसांना अत्यंत प्राथमिक पातळीवर काम करावे लागते. त्यामुळे त्यांचा दहशतवाद्यांशी येणारा संपर्क हा लष्करापेक्षाही जास्त असतो. कारण स्थानिक पातळीवर लहान पोलीस स्टेशनमध्ये ते कार्यरत असतात. रोजच्या व्यवहारासाठी त्यांचा सामान्य काश्मिरी जनतेशी थेट आणि रोजचा संपर्क असतो. हे पोलीस स्वतःचा जीव धोक्मयात घालून अत्यंत विपरीत परिस्थितीत काम करत असतात. म्हणूनच, ज्या दहशतवाद्यांना तोंड देत 1550 पोलिसांनी आपले आयुष्य पणाला लावले, त्या जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण पोलीस विभागावर संशय घेणे हे प्रामाणिक, कर्तव्यतत्पर पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करणारे ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवेंदर सिंगलाही जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनीच पकडले आहे. जर या प्रकरणामध्ये वरि÷ पोलीस सामील असते किंवा तसे काही जाळे असते तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न निश्चितच झाला असता. मुळात, त्याला पकडलेच नसते. इतकेच नव्हे तर पकडल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली असती. कारण त्याच्याकडून अनेक गुपिते उलगडण्याची, अनेकांचे बिंग फुटण्याची शक्मयता आहे.  पण असे न करता त्याला जिवंत पकडण्यात आले. यावरुनच जम्मू-काश्मीरमधील पोलिसांचा प्रामाणिकपणा दिसून येतो.

देवेंदर सिंग याने  स्वतःचा बचाव करताना, ‘मी या दहशतवाद्यांच्या आधारे माहिती काढण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना शरणागती पत्करण्यासाठी मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होतो,’ असे म्हटले आहे.  परंतु जेव्हा पोलिसांनी दहशतवाद्यांची चौकशी केली तेव्हा देवेंदर सिंग खोटं बोलतो आहे हे स्पष्ट झाले. ही बाब सिद्ध केली तीही जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनीच, ही गोष्ट विसरता कामा नये. जम्मू-काश्मीरचे आयजीपी विजेंदर कुमार यांनी देवेंदरला पकडल्यानंतर लगेचच स्पष्ट केले होते की, हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने याच्या चौकशीमध्ये आम्ही कोणतीही कमतरता, कसूर होऊ देणार नाही. एनआयएच्या चौकशीला  स्थानिक पोलीसयंत्रणा पूर्णपणे सहकार्य करते आहे. त्यातून या प्रकरणाचे अंतिम सत्य समोर येईलच. पण तरीही त्यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असणाऱया अफजल गुरुने त्याच्या ‘अ?Ÿफिडिटेव्हीट’मध्ये असे नमूद होते की, याच देवेंदर सिंग यांनी महंमद नावाच्या व्यक्तीला दिल्लीत आणण्यामध्ये आणि त्याला भाडय़ाने घर मिळवून देण्यास आपल्याला सांगितले होते. संसदभवनावर हल्ला केलेल्या पाच दहशतवाद्यांमध्ये या महंमदचा समावेश होता. त्याचा संदर्भ देऊन काही आरोप केले जात आहेत. वास्तविक, यासंदर्भात जेव्हा चौकशी झाली होती तेव्हा  त्यात काहीही तथ्य न आढळल्याने देवेंदर सिंगला निर्दोष ठरवण्यात आले होते.  देवेंदर सिंगवर अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये हात असल्याचे तसेच खंडणी उकळत असल्याचे आरोप झाले आहेत. एकीकडे असे आरोप होत असतानाच दुसरीकडे त्याला पदोन्नतीही मिळत होती.  एकाच वेळी अशा परस्परविरोधी गोष्टी देवेंदर सिंग बाबत का घडत होत्या? आत्ताही त्याला ‘सुपरिटेंडट ऑफ पोलीस’ म्हणून पदोन्नती मिळणार होती, तितक्मयातच ही घटना घडली आहे. याची कारणमीमांसा करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. देवेंदर सिंग हा स्थानिक पोलीस आहे. त्याचा जन्म काश्मीरमध्ये त्राल भागात झाला आणि तो तिथेच वाढला. 1990 मध्ये पोलीस सेवेत एक साधा इन्स्पेक्टर म्हणून रूजू झाला. तो अधिकारी म्हणून पोलीसदलात आलेला नव्हता. आयपीएस अधिकारी जेव्हा युपीएससीच्या माध्यमातून पोलीसदलात जातात, तेव्हा त्यांचा प्रत्यक्ष त्या क्षेत्राशी खोलवर संबंध येत नाही. पण स्थानिक अधिकाऱयांचा संबंध थेट स्थानिक पातळीवर किंवा फिल्डशी असतो. ते ‘सोल्जर ऑन फूट’ असतात. देवेंदर सिंगदेखील मूळचा काश्मीरमधीलच स्थानिक असल्याने त्याला तिथले खाचखळगे, दहशतवाद्यांचे नेटवर्क आदींविषयी माहिती होती. त्यामुळे दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी वरि÷ पातळीवरील अधिकाऱयांना देवेंदर सिंगची मदत व्हायची. त्यांचे अँटी टेररिझम स्क्वाड, अँटी हायजॅकिंग विभाग, संवेदनशील विभाग  या सगळय़ांनाच देवेंदर सिंगकडून बऱयाच गोष्टी समजायला मदत व्हायची. त्याने दिलेल्या माहितीवरून अनेक दहशतवाद्यांना पकडण्यात यशही आल्याचे मागील काळात दिसून आले.  कदाचित, त्यामुळेच की काय देवेंदरवर होणाऱया आरोपांकडे दुर्लक्ष होत गेले आणि त्याला बढती मिळत गेली असावी. या चुका घडलेल्या आहेतच. अन्यथा अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील पदावर त्याची नियुक्तीच झाली नसती. या सर्वाचाही छडा  एनआएच्या चौकशीतून लागणार आहे.या सर्वांत जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा होईल. अटक झाल्यानंतर देवेंदर सिंगला दहशतवादी घोषित केले आहेच.  त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटलाही चालणार आहे. त्याचे उर्वरित आयुष्यही तुरूंगात जाईल. मात्र एका देवेंदर सिंगमुळे जम्मू-काश्मीर पोलिसांची बदनामी होणार नाही, त्यांची प्रतिमा समाजात-देशात मलीन होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.  अशा प्रवृत्ती सर्वच क्षेत्रात आहेत.  पण एका सडक्मया आंब्यामुळे संपूर्ण जम्मू-काश्मीर पोलीसदलाच्या राष्ट्रभक्तीवर, वचनबद्धतेवर शंका घेणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे ठरेल. त्याचा परिणाम राष्ट्रीय-अंतर्गत सुरक्षेवर नकारात्मक होण्याची शक्मयताही नाकारता येत नाही. त्यामुळे राजकारणाच्या आणि राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहिले पाहिजे.

समारोप करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आजघडीला केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे तर देशातील कोणत्याही भागातील दहशतवादाच्या प्रश्नाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहिले जाते. त्याकडे राष्ट्रीय सुरक्षा समस्या म्हणून पाहिले जात नाही. परिणामी, त्याचा मुकाबला पोलिसांकडूनच केला जातो. कारण चौकशी, कायदा सुव्यवस्था, पोलीस हे राज्यसुचीतील विषय आहेत. यासाठी लष्कराला पाचारण केले जात नाही. पोलिसच दहशतवादाच्या प्रश्नाला सामोरे जातात. खरे पाहता, आज पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. पोलीस दलाची निर्मिती ही शस्त्रविहिन नागरिकांच्या सुरक्षेसाठी झाली आहे. पण या पोलिसांना एके 47 रायफल घेतलेल्या दहशतवाद्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दडपण आहे. हे दडपण असूनही पोलीस दहशतवादाचा अत्यंत सक्षमपणे मुकाबला करत आहेत. आज देशातील प्रत्येक राज्यात अँटीटेररिझम स्क्वाड तयार केले जात आहेत. दहशतवादी-नक्षलवादी हल्ल्यांमध्ये पोलीस शहीदही होत आहेत. त्यांच्या या राष्ट्राप्रती असणाऱया योगदानाचा आदर-सन्मान ठेवला जावा इतकेच !  

उन्नतीच्या शिखरावरून कडेलोट!

पुलवामा दहशतवादी हल्ला थोपवताना केलेल्या अतुलनीय कामगिरीबदल देवेंदर सिंग यांना जम्मू-काश्मीर राज्य शासनाचा वीरता पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे 2003 साली युनोच्या पीस किपिंग मिशनमधून देवेंदर सिंग कोसोवोला गेले होते. अलीकडेच जम्मू-काश्मीरला भेट दिलेल्या 16 विदेशी राजदूतांच्या पथकाची सगळी व्यवस्था देवेंदर सिंग यांनी केली होती. जम्मू-काश्मीर पोलीस प्रशासनाच्या जवळ जवळ सर्व खात्यात काम केलेल्या देवेंदर सिंग यांच्यावर आता देशद्रोही आणि हिझबुल मुजाहिदीनचे विश्वासू खबरे असा शिक्कामोर्तब झाला आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Related Stories

शाळांजवळच्या घरांना मागणी

Patil_p

पूनर्विक्रीतल्या घरांचा पर्याय

Patil_p

खरेदीदारांवर भार नाही

Patil_p

रक्तगट

Patil_p

बेडरूम

Patil_p

नवे तंत्र देईल का गती…

Patil_p