Tarun Bharat

देवेंद्र झाझरियाला ‘पद्मभूषण’, अवनी, कटारियाला ‘पद्मश्री’

Advertisements

भारताचे माजी फुटबॉल कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दुहेरी पॅरालिम्पिक सुवर्णजेता देवेंद्र झाझरियाला पद्मभूषण, पॅरालिम्पियन अवनी लेखरा, हॉकीपटू वंदना कटारिया, फसिल अली दार व भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देवेंद्र झाझरिया हा पॅरालिम्पिकमध्ये 2 सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय पॅरा-भालाफेकपटू व पहिला भारतीय पॅरा-ऍथलिट आहे. अवनी लेखरा एकाच पॅरालिम्पिक्समध्ये 2 पदके जिंकणारी आणि पॅरालिम्पिक सुवर्ण जिंकणारी पहिलीच भारतीय महिला क्रीडापटू आहे. वंदना कटारियाने 2013 महिला हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवले आहेत.

ब्रह्मानंद शंखवाळकर हे माजी भारतीय फुटबॉलपटू व भारतीय संघाचे माजी कर्णधार राहिले असून अनेक क्लब संघातर्फेही त्यांनी प्रतिनिधीत्व केले. निपूण गोलरक्षक म्हणून त्यांनी विशेष ओळख प्राप्त केली.

फसिल अली दार हे अली स्पोर्ट्स अकादमी मार्शल आर्ट्सचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक व भारतीय किकबॉक्ंिसगचे मुख्य प्रशिक्षक आहेत. काश्मीर खोऱयात क्रीडा प्रसारासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

Related Stories

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका रंगतदार ठरेल

Patil_p

भारताचा न्यूझीलंड दौरा लांबणीवर

Amit Kulkarni

ऑलिम्पिकसाठी भारताचा महिला हॉकी संघ जाहीर

Amit Kulkarni

चेल्सीच्या विजयात लुकाकूचे दोन गोल

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी फेडरर, सेरेनाचा सहभाग निश्चित

Patil_p

न्यूझीलंड महिला संघाच्या कर्णधारपदी सोफी डेव्हाईन

Patil_p
error: Content is protected !!