दुबई : येथे गुरूवारपासून सुरू झालेल्या 12 व्या फेझा आंतरराष्ट्रीय विश्व पॅरा ग्रा प्रि ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या देवेंद्रकुमार आणि निमिशा सुरेश यांनी सुवर्णपदके मिळविली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने सहा पदके मिळविली. पुरूषांच्या एफ-44 थाळीफेकमध्ये देवेंद्रकुमारने 50.61 मी. चे अंतर नोंदवित भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर महिलांच्या एफ 46-47 लांब उडी प्रकारात निमिशाने 5.25 मी. चे अंतर नोंदवित भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. पुरूषांच्या एफ-44 थाळीफेकमध्ये भारताच्या प्रदीपने रौप्यपदक तर बेलारूसच्या डिमिंट्रीने कास्यपदक घेतले. प्रदीपने 41.77 मी.चे अंतर नोंदविले. पुरूषांच्या 10 मी. टी-64 विभागात धांवण्याच्या शर्यतीत भारताच्या प्रणव देसाईने 11.76 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक, पुरूषांच्या एफ-52 थाळीफेकमध्ये भारताच्या विनोदकुमारने 18.52 मी. चे अंतर नोंदवीत कास्यपदक आणि महिलांच्या 1500 मी. धावणे टी-इलेव्हन विभागात भारताच्या रक्षिता राजूने 5 मिनिटे 22.15 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक पटकाविले.


previous post