Tarun Bharat

देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली नवी जबाबदारी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पुढील वषी देशात पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपाने कंबर कसली असून, पक्षाने राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

पुढील वर्षी मार्च-एप्रिल-मे दरम्यान पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने मोठी तयारी केली असून, पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपामध्ये फेरबदल केले आहेत. या राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपाने नव्या प्रभारिंची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची निवडणूक रणनीती आणि इतर सर्व निर्णय प्रक्रिया फडणवीसांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.

दरम्यान, पंजाबची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे, उत्तर प्रदेशची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान, उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तर मणिपूरचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

भाजपने आतापर्यंत काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन का केलं नाही – तोगडिया

Archana Banage

शाहूनगरच्या अमराईमध्ये हाणामारी

Patil_p

ऑन लाईन अभिनय स्पर्धेत स्नेहा धडवई प्रथम

Patil_p

कोरोना संकटात योगा आवश्यक : तिजानी मोहम्मद बंदे

datta jadhav

“भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढण्याची भीती”

Archana Banage

बार्शीत वाढले 109 रुग्ण, एकूण संख्या 295 वर

Archana Banage