Tarun Bharat

देवेंद्र फडणवीस, प्रतापसिंह राणे भेटीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘डिनर डिप्लोमसी’ अंतर्गत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना भेटण्यासाठी सांखळी गाठली. रात्री त्यांच्याबरोबर नेमक्या कोणत्या गप्पा रंगल्या व त्यांना कोणती गळ घातली हे समजले नाही. मात्र त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आणि काँग्रेस पक्षात कमालिची अस्वस्थता निर्माण झाली.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी मंत्री मायकल लोबो यांच्या कळंगूट येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्याबरोबर सकाळचा नाष्टा घेतला. यावेळी मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो याही उपस्थित होत्या. मायकल लोबो यांनी आपल्या पत्नीची ओळख करून देताना या डिलायला लोबो शिवोलीच्या उमेदवार अशीच करून दिली.

लोबो, पार्सेकर यांच्याही घेतल्या भेटी

लोबो यांचा पाहुणचार घेऊन देवेंद्र फडणवीस हे लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भेटण्यासाठी हरमल येथे त्यांच्या निवासी गेले. तिथे मनमोकळेपणाच्या गप्पाटप्पा झाल्यानंतर ते दुपारी पुन्हा पणजीत आले. त्यांनी भाजपच्या प्रत्येक आमदार व मंत्र्यांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. प्रत्येकाबरोबर चर्चा करताना स्थानिक एकाही पदाधिकाऱयाला त्यांनी बरोबर घेतले नाही. त्यांची मते व विचार जाणून घेण्याचे प्रयत्न त्यांनी केले.

राणेंच्या निवासस्थानी रात्रभोजन

सायंकाळी ते प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना घेऊन सांखळी येथील प्रतापसिंह राणे यांच्या फार्म हाऊसवर रवाना झाले. तिथे त्यांच्याबरोबर रात्रभोजन घेतले. त्यावेळी राणे यांच्या पत्नी विजयादेवी राणे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे देखील उपस्थित होते. विश्वजित राणे यांच्यासाठी प्रतापसिंह राणे राजकीय सन्यास घेणार काय? हे पहायचे आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’ मधून भाजपला अनेक गोष्टींचा खरोखरच लाभ होईल का ? हे पहावे लागेल. तुर्तास तरी त्यांनी पक्षातील हेवेदावे संपुष्टात आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. मात्र राणेंबरोबर फडणवीस यांची झालेली चर्चा हा काँग्रेससाठी फार मोठा धोका व धक्का ठरणारा असावा. विश्वजित राणे यांनी भाजप सोडून जाऊ नये, त्यांना व त्यांच्या पत्नीला उमेदवारी भाजप देणार असल्याने त्यासाठी प्रतापसिंह राणे यांचा आशीर्वाद हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Stories

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्लाझ्मा बँक

Patil_p

डिचोली उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल

Amit Kulkarni

पणजीचे फेस्त साधेपणाने

Patil_p

शिरगाववासीयांची पाण्याची बिले जिल्हा खनिज निधीतून भरण्याचा प्रस्ताव

Patil_p

शेळप खुर्द शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रोहिदास गावकर

Amit Kulkarni

प्रत्येक निवडणूक फायनलच अन् प्रत्येक मतदार महत्त्वाचा

Patil_p
error: Content is protected !!