Tarun Bharat

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता ‘ही’ जबाबदारी

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांची बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

 
दरम्यान, यंदा बिहार विधानसभेच्या निवडणूका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी बिहारचा निकाल स्पष्ट होणार आहे. 


प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मी आभारी आहे. एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी ही एक शिकायची संधी आहे. पूर्ण ताकदीनिशी आम्ही बिहारची निवडणूक लढू असेही त्यांनी यावेळी सांगितले.


फडणवीस यांच्यावर पक्षाकडून अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी पहिल्यांदाच सोपवण्यात आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान आपल्या संघटन कौशल्याचा वापर करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले होते, त्यानंतर त्याच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

Related Stories

सदावर्ते यांचा अडचणींचा वनवास संपता संपेना, आता ‘हे’ पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता

Abhijeet Shinde

नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

अमेरिकेच्या सीमेवर ४ भारतीयांचा मृत्यू

Abhijeet Shinde

गुजरातमध्ये बॉर्डर व्ह्य़ू पॉईंटची निर्मिती

Patil_p

उत्तराखंडात 516 नवे कोरोना रुग्ण; 13 मृत्यू

Rohan_P

राजू शेट्टींना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात अडचण?, अजित पवार म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!