Tarun Bharat

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट

Advertisements

मुंबई \ ऑनलाईन टीम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. या भेटीवेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याम मिळालेली नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबत त्यांनी या भेटीचा फोटो देखील शेअर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याला राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार असून गेल्या १५ महिन्यांमध्ये या प्रश्नाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसी समाजाला आजचा दिवस पाहावा लागल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्भेया टीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Related Stories

जुलैची रेकॉर्ड ब्रेकच्या दिशेने वाटचाल

Patil_p

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

Rohan_P

सातारा येथील महाराष्ट्र स्कुटर्स कंपनीचा प्लान्ट तातडीने सुरु करा

Patil_p

कर्नाटकात सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली

Abhijeet Shinde

पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल?; राहुल गांधींनी दिले उत्तर

Abhijeet Shinde

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!