बेंगळूर : मागील पाच दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झालेले माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नी चेन्नम्मा संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामुळे सोमवारी उभयतांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आपण लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केलेल्या प्रत्येकाला धन्यवाद देत असल्याचे देवेगौडा यांनी सांगितले आहे. इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देवेगौडा यांनी कृतज्ञता पत्र लिहिले असून आपण आणि पत्नी चेन्नम्मा कोरोनाबाधित झाल्याचे समजताच अनेकांनी काळजी व्यक्त केली होती. काही जणांनी आपण लवकर संसर्गमुक्त व्हावे, अशी आशा व्यक्त केली. त्याबद्दल तुम्हाला मनपुर्वक धन्यवाद देत आहे. लवकरच मी पुन्हा क्रियाशिल होवून जनतेच्या सेवेसाठी दाखल होईन, असे त्यांनी कृतज्ञता पत्रामध्ये म्हटले आहे.


previous post