Tarun Bharat

देव बोडगेश्वरच्या अध्यक्षपदी आनंद भाईडकर यांची हॅट्रिक

प्रतिनिधी /म्हापसा

म्हापसा येथील प्रसिद्ध जागृत देव श्री बोडगेश्वर मंदिराची निवडणूक होऊन 2022-25 या तीन वर्षासाठी नवीन समिती निवडण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी आनंद भाईडकर यांची सतत तिसऱयांदा एकमताने बिनविरोध निवड झाली.

निवडण्यात आलेले इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणेः उपाध्यक्ष- श्रीराम शिंदे, सचिव- ऍड. वामन पंडित, उपसचिव- हरिशचंद्र (सुशांत) गांवकर, खजिनदार- चंद्रकांत (पांडुरंग) कोरगावकर, उपखजिनदार- शामसुंदर पेडणेकर, मुखत्यार- राजेंद्र पेडणेकर, उपमुखत्यार- पांडुरंग वराडकर यांची निवड झाली.

अध्यक्षपदासाठी आनंद भाईडकर यांना 410 मते तर ऍड. महेश राणे यांना 297 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी श्रीराम शिंदे यांना 336 मते तर दिपक म्हाडेश्री यांना 279 तर संजय बर्डे यांना 62 मते मिळाली. सचिव पदासाठी ऍड. वामन पंडित यांना 375 तर अशोक गोवेकर यांना 317 मते मिळाली. उपसचिवपदासाठी शुशांत गावकर यांना 382, निशिकांत साळगावकर यांना 76, अमर पेडणेकर यांना 90, भारत तोरस्कर यांना 89 मते मिळाली. खजिनदार पदासाठी चंद्रकांत कोरगावकर यांना 398, गुरुदास वायंगणकर यांना 147, श्रीपाद येंडे यांना 137 मते मिळाली. उपखजिनदार पदासाठी श्यामसुंदर पेडणेकर यांना 424, रामचंद्र तुयेकर 242 तर उदय च्यारी यांना 30 मते मिळाली. मुखत्यार पदासाठी राजेंद्र पेडणेकर यांना 352, मदन आराबेकर 331 तर उपमुखत्यार पदासाठी पांडुरंग वराडकर यांना 318, नंदकिशोर शिरगावकर 255, सागर आरोलकर यांना 65 तर सचिन किटलेकर यांना 38 मते मिळाली.

निर्वाचन अधिकारी म्हणून ऍड. विलास पाटकर, ऍड. देवेंद्र गवंडळकर व रेश्मी मिरजकर यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी आपली सलग तिसऱयावेळी देवस्थानच्या अध्यक्षपदी हॅट्रिक झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढील 3 वर्षे या देवस्थानासाठी विविध नवीन योजना आखून हे मंदिर नावलौकिस मिळविण्याकरीता आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री देव बोडगेश्वराच्या कृपाशीर्वादाने सर्व देवस्थान महाजनांचे आपल्यास यापुढेही असेच सहकार्य लाभो असे दै. तरुण भारतशी बोलताना सांगितले.

Related Stories

सोनसडय़ावर 50 टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यास पालिका राजी

Patil_p

मडगावच्या घाऊक मासळी मार्केटसाठी अखेर आशेचा किरण

Amit Kulkarni

शेळ-मेळावली ग्रामस्थांच्या आंदोलनाला कलाटणी

Amit Kulkarni

मोदी सरकारकडून जमिनींसह आकाश, पाताळही विक्रीस

Amit Kulkarni

धेंपो क्लब-चर्चिल ब्रदर्स प्रो. फुटबॉल स्पर्धेतील लढत बरोबरीत

Amit Kulkarni

बाळ्ळी पंचायतीकडून मान्सूनपूर्व कामांना वेग

Omkar B