Tarun Bharat

देव बोडगेश्वराचा 29 वा वर्धापनदिन उत्साहात

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा श्री देव बोडगेश्वराचा 29 वा वर्धापनदिन सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला.

सकाळी 10 वा. पांडुरंग कोरगांवकरतर्फे लघुरुद्र पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती, महाप्रसाद व सुवासिनीतर्फे दीपोत्सव व रात्री दारू कामाची आतषबाजी झाली. रात्री ॐ साई सत्य सेवा मंडळ म्हापसातर्फे प्रांर्थना, भजन झाले. तद्नंतर कलेश्वर नाटय़ मंडळातर्फे नाटक अजिंक्य तारा सादर करण्यात आले. सकाळच्या सत्रात अनेकरांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यात काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव, नगरसेवक व काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सुधीर कांदोळकर, हळदोणा तारक आरोलकर, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, नगरसेविका नुतन बिचोलकर, माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, बाबी बागकर, साईनाथ राऊळ, आनंद भाईडकर, सुनील कवठणकर, ऍड. शशांक नार्वेकर, ऍड. सुभाष नार्वेकर आदींचा समावेश आहे.

Related Stories

डिचोलीचे नगरसेवक निलेश टोपले यांचा भाजपप्रवेश

Patil_p

भाजप सरकारचे अल्पसंख्यांकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज गैरप्रकारांची शक्यता

Omkar B

सावर्डे ‘आनंदी गार्डन्स’च्या अध्यक्षपदी मोर्तू नाईक यांची बिनविरोध फेरनिवड

Amit Kulkarni

म्हादई प्रत्यक्ष पाहणीवेळी कर्नाटकची दंडेलशाही

Amit Kulkarni

मासेमारीसाठी गेल्यावेळी बेपत्ता झालेल्या युवकाचा थांगपत्ता नाही

Patil_p