Tarun Bharat

देशभरात लस पोहचविण्यासाठी विमानतळांवर तयारी सुरू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना लसीचे डोस संपूर्ण देशात पोहचविण्यासाठीभारतीय हवाई वाहतूक आणि विमानतळ व्यवस्थापनाने तयारी सुरू केली आहे. 

भारतात कोरोना लस केव्हा उपलब्ध होईल, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, लस उपलब्ध झाल्यावर त्याची सुरक्षित आणि सहजरित्या वाहतूक करता येईल, यासाठी विमानतळांवर कार्गो युनिट्स तयार करून, कोल्ड चेन स्टोरेज व्यवस्था निर्माण केली जात आहे. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर ग्रुपने या दोन्ही ठिकाणी कुलिंग चेंबर्स उभारले आहेत. 

लसीच्या वाहतुकीसाठी आवश्यक असणारी ‘टाइम एंड टेम्प्रेचर डिस्ट्रीब्यूशन’ प्रणाली जीएमआर ग्रूपकडे आहे. तर स्पाइसजेटच्या कार्गो इकाई, स्पाइसएक्स्प्रेसने ‘ग्लोबल कोल्ड चैनसोल्यूशन प्रोव्हाइडर्स’सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे त्यांनाही लसीची वाहतूक सुरळीत करता येईल.

Related Stories

4 वर्षीय मुलीला लागण, कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा

Patil_p

पँगाँगमधील सैन्यमाघार पूर्ण

Patil_p

भाजपला मतं द्या, 50 रुपयांत दर्जेदार दारू देऊ

datta jadhav

जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक

datta jadhav

आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणावर आज निर्णय

Patil_p

हरयाणात 30 जून पर्यंत च्युईंगम विक्रीवर बंदी 

prashant_c