Tarun Bharat

देशमुखांनंतर काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता ईडीच्या रडारवर

नागपूर/प्रतिनिधी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने छापेमारी केल्यांनतर आता काँग्रेचे नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊतही ईडीच्या रडावर येण्याची चिन्हे आहेत. रेती, कोळसा आणि जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी नितीन राऊत यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. तरुण परमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राऊत यांची ईडीकडून चौकशी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अॅड. तरुण परमार यांचे काय आहेत आरोप
अॅड. तरुण परमार यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडे तक्रार केली आहे. या दोन्ही नेत्यांवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती, कोळसा, जमिनीत गैरव्यवहार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. परमार यांच्या या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन ईडीने परमार यांना समन्स बजावून मुंबईला जवाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. या प्रकरणी ईडीला पुरावे दिल्याचा दावा परमार यांनी केला आहे.

मनी लॉन्ड्रिंग आणि हवालाद्वारे भ्रष्टाचार केल्याचा आरोप

विद्यमान मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, नागपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि राऊत यांचे पीए आदींविरोधात अॅड. तरुण परमार यांनी तक्रार दिली होती. त्यांनतर ईडीने समन्स बजावून त्यांना जबाब देण्यासाठी बोलावलं होतं. दरम्यान, परमार यांनी मी त्यांना भेटलो. माझी साक्ष दिली आणि काही कागदपत्रे दिली, असं ते म्हणाले. भ्रष्टाचार, हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप मी केले आहेत. मनी लॉन्ड्रिंग आणि हवालाद्वारे कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला आणि त्या पैशाचा कसा कसा कुठे कुठे वापर झाला याची माहिती मी ईडीला दिली आहे. मी कागदपत्रं दिली आहेत. ईडी संतुष्ट आहे. त्यांनी अजून कागदपत्रे मागितली तर पुन्हा देईल, असंही त्यांनी सांगितलं. ईडीने कारवाई केली नाही, तर पुढे काय करायचं त्याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उत्तम समन्वयाने परिस्थिती हाताळा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Archana Banage

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, साताऱ्याच्या दोघांचा मृत्यू

datta jadhav

”कोरोनानंतर जगावर आणखी एका महामारीचं संकट येईल”

Abhijeet Khandekar

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ! एमआयएमचे ४ आमदार RJD मध्ये

Archana Banage

उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; 13 प्रमुख राज्यांमध्ये झाले सर्वेक्षण

Tousif Mujawar

सांगली : सुळकाई डोंगर परिसराची स्वच्छता मोहिम

Archana Banage