Tarun Bharat

देशमुखांना दिलासा नाहीच; समन्स रद्द करण्यास कोर्टाचा नकार

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यापासून अज्ञातवासात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर असताना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडी आणि सीबीआयने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. ईडीकडून देशमुख यांना पाचवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. मात्र, देशमुख ईडीपुढे हजर झाले नाहीत. ईडी आणि सीबीआयच्या सर्व समन्सविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेऊन ईडीनं बजावलेले समन्स रद्द करत या कारवाईला स्थगिती आणि अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी याचिकेतून केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला. तसेच कारवाईपासून संरक्षणासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना केली.

Related Stories

कोयनानगर पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकर तयार करा

Patil_p

”माझे व्हिडीओ काढत मलाच कोर्टात खेचणाऱ्यांचं वाटोळं होणार”

Sumit Tambekar

आसाममधील 22 गावे पूरग्रस्त, जनजीवन विस्कळीत

datta jadhav

हत्येच्या आरोपात हत्तिण अन् तिच्या पिल्लाला पकडले

Patil_p

पाकिस्तान एअर फोर्समध्ये पहिल्यांदाच हिंदू पायलट दाखल

prashant_c

कोल्हापूर : विनापरवाना मोबाईल प्रदुषण तपासणी व्हॅनकडून दुचाकीवाल्यांची लूट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!