Tarun Bharat

देशमुख रोडच्या कामाला अखेर प्रारंभ

तरुण भारत वृत्ताची घेतली दखल

बेळगाव : देशमुख रोडच्या कामाला अखेर प्रारंभ झाला. टिळकवाडी येथील महत्त्वाच्या सी. डी. देशमुख रोडची अक्षरशः चाळण झाली होती यासंदर्भात ‘तरुण भारत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याचाच परिणाम म्हणून बुधवारपासून सी. डी. देशमुख रोडच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. शहरातील असंख्य रस्त्यांप्रमाणेच या रस्त्याची दुरवस्था झाली होती. याचा नागरिकांना आणि व्यावसायिकांना अधिक फटका बसतो. अर्धवट कामामुळे सर्वत्र खडी, मातीचे ढिगारे हे चित्र दिसते. मात्र, आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार याद्यांसंदर्भात जागृतीफेरी

Amit Kulkarni

म. ए. समितीच्या त्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात येवू नये

Patil_p

जिल्हय़ात सोमवारी 399 जणांनी केली कोरोनावर मात

Amit Kulkarni

राखीव दलाच्या सहाव्या तुकडीचे आज पथसंचलन

Patil_p

बेळगाव शहर पाणीपुरवठ्यात 17, 18 रोजी पुन्हा व्यत्यय

Sandeep Gawade

पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत

Patil_p