Tarun Bharat

देशवासियांच्या राख्यांमुळे सैनिकांना प्रोत्साहन मिळते : निवृत्त कर्नल विक्रम पत्की

ऑनलाईन टीम /  पुणे :

मी १५ वर्षे जम्मू कश्मिरच्या भागात काम केले आहे. सैन्य दलात देखील सण साजरे केले जातात. परंतु  जेव्हा देशवासियांनी पाठविलेल्या या आपुलकीच्या राख्या आणि पत्र जेव्हा त्यांना येतात, तेव्हा त्यांना मोठे प्रोत्साहन मिळते. आपल्या परिवाराबरोबरच संपूर्ण देश आपल्यामागे उभा असल्याचे त्यांना वाटत असते, असे मत निवृत्त कर्नल विक्रम पत्की यांनी व्यक्त केले.


आम्ही पुणेकर या संस्थेच्यावतीने जम्मू आणि कश्मिरमधील सैनिकांकरीता दिव्यांगांनी बनविलेल्या राख्या आणि चॉकलेट राख्या रवाना करण्यात आल्या. राख्यांचे पूजन सोमवार पेठेतील सुयश हॉटेलसमोर असलेल्या पद्मसुंदर बेकरी येथे झालेल्या कार्यक्रमात दृष्टीहिन मुले व विक्रम पत्की यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, प्रणव पवार, सुभाष सुर्र्वे, अखिल झांजले, मूर्तीज् प्रोडक्टचे विक्रम मूर्ती, डॉ. स्वप्नील शेठ, दृष्टीहिन रामदास लढे, राजेंद्र तरगे, पवन नागंरे, श्वेता जाधव, राधिका कोरे, स्नेहल अनिता, बाळासाहेब बांगर, सिध्दी राऊत, सचिन राऊत, उमेश सोनेरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमला मूर्तीज् प्रोडक्टचे देखील सहकार्य लाभले. 


हेमंत जाधव म्हणाले, जम्मू-काश्मिरमधील सांबा सेक्टर, डोडा, रियासीसह विविध भागांतील सैनिकांना या राख्या आम्ही बांधणार आहोत. नेहमीच्या राख्यांपेक्षा चॉकलेटच्या राख्या यंदा जवानांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाकरीता अनेक संस्थांनी सहकार्य केले असून जम्मू काश्मिरमधील जनरल झोरावर सिंग ट्रस्टचे देखील सहकार्य लाभले आहे.

Related Stories

लोककलेचा प्रसार होण्यासाठी चित्रपट हे चांगले माध्यम

Tousif Mujawar

पुणे : भारतीय निवडणूक आयोगात संतोष अजमेरा यांची नियुक्ती

Archana Banage

सरकारला कसलीच लाज उरली नाहीये – गोपीचंद पडळकर

Abhijeet Khandekar

ST विलीनीकरण नाहीच, मंत्रिमंडळातही शिक्कामोर्तब

Archana Banage

चित्रपट महामंडळाच्या ‘समारंभ आयोजन समिती’च्या सदस्यपदी स्वाती हनमघर

Tousif Mujawar

मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

datta jadhav