Tarun Bharat

देशव्यापी बंद, हे पाकीटमार दलालांचे आंदोलन

Advertisements

कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रतिनिधी / मिरज

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भाजपने शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले. शहरातील बोलवाड रोडवरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नवा कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असल्याचा दावा करून या कायद्याचे महत्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले. आमदार सुरेश खाडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ‘पाकिटमार दलालांच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी नाही’ असे पोस्टर घेऊन देशव्यापी आंदोलनाच्या विरोधात भाजपने घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात मिरज शहर आणि ग्रामीण भागात विविध पक्ष आणि संघटनांकडून संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी दुपारी महाराणा प्रताप चौकात सर्वपक्षीय आंदोलन सूरु असताना भाजपने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले. नवा कृषी कायदा हा शेतकरी हिताचा आहे. ‘मी शेतकरी : पाकिटमार दलालांच्या भारत बंद आंदोलनात सहभागी होणार नाही’ असे पोस्टर घेऊन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले.

Related Stories

सांगली : आटपाडी सौदे बाजारात डाळींबाला उच्चांकी दर

Abhijeet Shinde

मिरजेत पेट्रोलपंपावर बेवारस बॅग व पोत्यामुळे धावपळ

Sumit Tambekar

सांगली : किरकोळ कारणावरुन तरूणाला बेदम मारहाण, पाच जणांवर गुन्हा

Abhijeet Shinde

गॅस पंप बंद झाल्याने सांगलीतील सात हजार रिक्षाचालक चिंतेत

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा पत्रकार संघटनेचा उद्या पुरस्कार वितरण सोहळा

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्याला दिलासा : पॉझिटिव्हीटी रेट पाचच्या खाली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!