Tarun Bharat

देशाचा रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. बुधवारी देशात 30 हजार 570 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 431 रुग्ण दगावले. तर 38 हजार 303 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, देशाचा रिकव्हरी रेट 97.64 टक्के आहे.

देशात आतापर्यंत 3 कोटी 33 लाख 47 हजार 325 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 कोटी 25 लाख 60 हजार 474 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात 3 लाख 42 हजार 923 उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4 लाख 43 हजार 928 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत 76.57 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. मागील 24 तासात 64.51 लाख नागरिकांचे लसीकरण झाले.

Related Stories

हद्दवाढीसाठी राज्य शासनाला फेरप्रस्ताव

Abhijeet Khandekar

डीसीजीआयच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतात फायझर, मॉडर्नासारख्या परदेशी लसी येण्याचा मार्ग मोकळा

Archana Banage

बांगलादेशला सोपविले 10 ब्रॉडगेज डिझेल इंजिन्स

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

datta jadhav

दिल्लीत मागील 24 तासात 138 कोरोना रुग्ण बरे

Tousif Mujawar

ट्रक-क्रूझरच्या भीषण अपघातात 7 जण ठार

datta jadhav