Tarun Bharat

देशाची लाडकी गानकोकीळा , गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन

Advertisements

प्रतिनिधी/ मुंबई

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जाण्याने  देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे.लतादिदींवर रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव हे भारताचा राष्ट्रीय ध्वज गुंडाळण्यात आले होते. त्यांचे निवासस्थान असलेल्या प्रभूकुंज येथे पोलीस बॅंडद्वारे संवेदना संगीत वाजवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी शिवाजी पार्कातही त्यांनी सैन्य आणि पोलीस दलाकडून सन्मान देण्यात आला.  हिंदु धर्माच्या विधीनुसार त्यांच्या पार्थिवावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शिवाजी पार्क येथील मैदानात त्यांच्या पार्थिवाला रात्री 7.15 वाजता पंडीत ह्दयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला.लतादीदींचा सन्मान म्हणून त्यांना बंदुकीची सलामीही देण्यात आली. पेंद्र सरकारच्या गफह विभागाने रविवारी लतादीदींच्या निधनाचे वफत्त कळताच देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर महाराष्ट्र सरकारने सोमवारी 7 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यावेळी देशाचे पंतप्रधान मोदी  उपस्थित लावत आदरांजली वाहिली. (त्पच स्ंजं  दिदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपुमख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह मोठे नेते उपस्थित होते.

नेते अभिनेत्यांसह मान्यवरांची उपस्थिती

लतादिंदिंना आदरांजली वाहण्यासाठी क्रिकेटपटु मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर,अंजली तेंडुलकर ,मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुप्रिया सुळे ,राज्यमंत्री मंडळातील छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे , विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बॉलिवुड अभिनेता शाहरूख खान, गौरी खान ,अभिनेता अमिर खान, रणबीर कपुर, गितकार जावेद अख्तर, ज्येष्ठ गायिका अनराधा पौडवाल, गायक शंकर महादेवन, महापौर किशोरी पेडणेकर आदिंनी शिवाजी पार्क मैदानात उपस्थित राहुन आदरांजली वाहीली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडुन मंगेशकर कुटुंबियांचे सात्वन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कात आल्यानंतर मंगेशकर कुटुबियांची सांत्वनपर विचारपुस केली तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत विचारपुस केली.

बाळासाहेब लता यांचे बहीण भावाचे नाते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भावा बहीणीचे नाते होते,बाळासाहेबांच्या पार्थिवावर ज्या शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले,त्याच मैदानात लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लता मंगेशकर यांच्या निवास तसेच अंत्यविधीसाठी मोठा पोलीस फौजफाटा

लता दिदींच्या निधनामुळे मोठय़ा प्रमाणात सेलिब्रिटी तसेच जनसागर लोटणार याची कल्पना असलेल्या मुंबई पोलिसांनी लता दिदींचे घर तसेच शिवजीपार्क येथे मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

यावेळी 20पोलीस उपायुक्त, 435 पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 2 हजार 275 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त दिदींच्या प्रभाकुंज आणि शिवजीपार्क येथे तैनात करण्यात आला होता. मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे लतादीदींचे निधन झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली.  ब्रीड पॅंडी हॉस्पिटल येथून त्यांचे पार्थिव दक्षिण मुंबईच्या पेड रोड येथील प्रभू कुंज या राहत्या घरी प्रभू कुंज येथे ठेवण्यात आला होता. यामुळे प्रभू कुंज येथे मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता लतादीदींवर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्ययात्रेच्या मार्गावरील वातहुकीत बदल

लतादीदींची अंत्ययात्रा ज्या मार्गावरुन शिवाजी पार्क येथे निघाली त्या महत्वाच्या रस्त्यावर मुंबईतील वाहतूक व्यवस्थाही वळवण्यात आली होती.  मुंबईतील पेडर रोड येथे व्हीआयपी मुव्हमेंट लक्षात घेता, याठिकाणी जाणार्या रस्त्यांची वाहतूक वळवण्यात आली होती. तर शिवाजी पार्क परिसरात येणार्या वाहतुकीतही काही बदल करण्यात आले होते. दादरमध्येही वाहतूक विभागाकडून रस्ते वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांकडुन शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या सुचना

 दादरच्या शिवाजी पार्क येथील मैदानात लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसारच शिवाजी पार्क येथे मोठय़ा प्रमाणात या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी खुद्द पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील तयारीचा आढावा घेतला. पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही मोठय़ा प्रमाणातील व्हीआयपी मुव्हमेंट लक्षात घेता, चोख बंदोबस्त ठेवण्यासाठीची तयारी केली होती.

Related Stories

‘स्पुतनिक-व्ही’ लसीचे ऑगस्टपासून भारतात उत्पादन?

datta jadhav

भाजपने अपर्णा यादव यांचे तिकीट कापले

datta jadhav

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबच्या डीआईजींचा राजीनामा

datta jadhav

तृणमूल खासदार देवतांसंबंधी बरळला

Patil_p

ट्विटर वापरासाठी मोजावे लागणार पैसे

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा 80 हजार पार

Rohan_P
error: Content is protected !!