Tarun Bharat

देशाच्या जीडीपीपेक्षा लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य अधिक

वृत्तसंस्था/ मुंबई

एक दशकाहून अधिक कालावधीनंतर शेअर बाजारामध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मूल्य देशाच्या जीडीपीपेक्षाही अधिक राहिले आहे. या अगोदर अशी स्थिती 2007 मध्ये घडली होती. जेव्हा बाजारमूल्य देशाच्या जीडीपीच्या 100 टक्क्यांपेक्षा अधिक होते तेव्हा अशी स्थिती होते.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 195 लाख कोटी मूल्याचे राहणार असल्याचे संकेत नॅशनल स्टॅटेस्टिक कार्यालय (एनएसओ) यांच्याकडून देण्यात आले होते. हा आकडा मुंबई शेअर बाजारात लिस्ट असणाऱया कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यापेक्षाही कमी आहे. बाजारमूल्य 14 जानेवारी रोजी 197 लाख कोटी रुपये होते. म्हणजे देशाचा जीडीपी एकूण मूल्याच्या तुलनेत 99 टक्के असल्याचीही नोंद करण्यात आली आहे. 

डिसेंबर 2007 मधील स्थिती

13 वर्षांच्या अगोदर डिसेंबर 2007 मध्ये बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य जीडीपीच्या 149 टक्के झाले होते. ही स्थिती आतापर्यंत विक्रमी टप्प्यावर राहिली आहे. डिसेंबर 2019 मध्ये भारताच्या जीडीपीच्या तुलनेत बाजारमूल्य 78 टक्के आणि मार्च 2020 मध्ये 56 टक्क्यांच्या जवळपास राहिल्याची नोंद आहे.

अमेरिका, जपान, ब्रिटनमधील स्थिती

साधारणपणे अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स आणि स्विर्त्झलँड यासारख्या देशांमध्ये बाजारमूल्य जीडीपीपेक्षा अधिकच आहे. तर दुसऱया बाजूला जर्मनी, चीन, ब्राझील आणि रशियामध्ये ही स्थिती कमी आहे. विशेष बाब म्हणजे भारतीय शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य मार्च 2020 मध्ये मोठय़ा प्रमाणात घसरले होते, त्यानंतर हा आकडा 75 टक्क्यांनी वाढला आहे. याला विदेशी गुंतवणुकीचा मोठा आधार राहिला आहे.

Related Stories

सलग दुसऱया दिवशीही बाजाराची घसरण

Patil_p

मल्टीप्लेक्स कंपन्यांचा प्रवास तोटय़ात

Amit Kulkarni

साखर उत्पादनात वाढीचा टक्का कायम

Patil_p

कॅनरा बँकेचा तिमाही नफा दुपटीने वधारला

Patil_p

कमोडीटी बाजारात सोने 1500 रुपयांनी वधारले

prashant_c

आयफोन 14 मिळणार 30 मिनीटात

Patil_p