Tarun Bharat

देशाच्या विकासात शेती क्षेत्राबरोबरच ट्रॅक्टरच्या माध्यमातून वितरकांचा हातभार

बालिंगेत टॅफे कंपनीच्या अध्यक्षा पद्मश्री मल्लिका श्रीनिवासन यांचे उद्गार

वाकरे / प्रतिनिधी

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, देशाच्या विकासात शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे, त्यामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपला हातभार लागत असल्याचा  अभिमान वितरकांनी बाळगावा असे उद्गार टॅफे कंपनीच्या अध्यक्षा पद्मश्री मल्लिका श्रीनिवासन यांनी केले. 

 बालिंगे (ता. करवीर) येथील महालक्ष्मी ट्रॅक्टर शोरुमला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मल्लिका श्रीनिवासन यांच्या कारकिर्दीत चेन्नई बाहेर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका ट्रॅक्टर वितरक शोरुमला भेट दिल्याने त्यांच्यासह कन्या डॉ. लक्ष्मी वेणू यांचे जोरदार स्वागत  महालक्ष्मी ट्रॅक्टरचे कपील जांभळे, वसंतराव जांभळे व विशाल जांभळे यांनी केले.  यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीची स्थिती, ट्रॅक्टरचा वापर आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती याबाबत माहीती जाणून घेतली. टॅफे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिन्हा, नरेंद्रकुमार गुप्ता, नितीन जाधव, विक्रम गुजर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे, सरपंच मयुर जांभळे, कृष्णात जांभळे  उपस्थित होते.  

Related Stories

#TokyoOlympics: बॉक्सिंग स्टार मेरी कॉमची विजयी सलामी, हर्नांडिज गार्सियावर केली मात

Archana Banage

‘H10N3’ बर्ड फ्लूचा प्रथमच मानवी संसर्ग

datta jadhav

शाळेतील प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

Archana Banage

Kolhapur : ‘लाल बावटा’चे आजचे आंदोलन स्थगित

Abhijeet Khandekar

ओबीसी जातवार जनगणना मागणीसाठी जानेवारीत यल्गार

Archana Banage

थ्री इडियट्सवाल्या ‘रँचो’ची कमाल

Patil_p