Tarun Bharat

”देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणेंना महत्त्वाची जबाबदारी”

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून दोन दिवशीय जन-आशिर्वाद यात्रेला सुरूवात झाली आहे. नारायण राणे यांचे गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. नारायण राणे यांचे भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आले. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जन-आशिर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणे यांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जन आशिर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशिर्वाद लाभला आहे. तसंही राणेसाहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही. वरुण राजाच्या आशिर्वादाने सुरु झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक जना जनाचा आशिर्वाद घेऊन मोदीजींच्याप प्रति कृतज्ञता प्रगट करुन ही यात्रा जाणार आहे. बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे. देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणे यांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

नारायण राणे यांच्या खात्याअंतर्गत८० टक्के उद्योग येतात, देशाचा जीडीपी हा विभाग ठरवतो. महाराष्ट्रमध्ये आज जे सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे या सरकारच्य नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे हे मी सांगण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र गेल्या ५ वर्षामध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचे राज्य झालं होतं. सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक राज्यात येत होती, पण गेल्या २ वर्षामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि बाकीची राज्ये पुढे चालली आहेत. ज्याप्रकार सरकारी स्तरावर वसुली सुरू आहे त्यासाठीआता संघर्षाशिवाय पर्याय नाही, जनतेसाठी संघर्षं केल्याशिवाय पर्याय नसल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नावाप्रमाणेच उद्ध्वस्त करायला निघाले आहेत -नारायण राणे

मुंबईत जन आशीर्वाद यात्रेसाठी नारायण राणे यांनी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राची जनता आता सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा विकास करू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नावाप्रमाणेच उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेल्या सरकारला सांगुयात की आता तुमचा काळ संपला आहे. आता भाजप सत्तेत येणार आहे, अशी तुमचा काळ संपला आहे, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी राज्य सरकारवर केली.

Related Stories

आरेत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

datta jadhav

Exclusive News : कोल्हापुरात भर चौकात दम मारो दम, तर तावडे हॉटेल परिसरात आतषबाजी

Archana Banage

कोल्हापूर : शिवसेनेचा कृषी विधेयका विरोधात बैलगाडी मोर्चा

Archana Banage

अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

Abhijeet Khandekar

‘हरियाणा फ्रेश’ नावाने बॉटल बंद पाणी तयार करणार सरकार

Tousif Mujawar

इराण-अमेरिका संकट : एअर इंडियाने विमान प्रवासाचे मार्ग बदलले

prashant_c
error: Content is protected !!