Tarun Bharat

देशातील आर्किटेक्चर मैदान गाजवणार

Advertisements

कोल्हापूर / संग्राम काटकर

एरवी इमारत आराखडा, लॅण्डस्केप डिझाईन, शहर विकासकामांसाठींचा पाठपुरावा करण्यात गुंतून राहणारे आर्किटेक्चरांचे हात कोल्हापुरात होत असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे मैदाने गाजवण्यात गुंतणार आहेत. निमित्त आहे. महाआयआयएपीएल क्रीडा स्पर्धांचे ६ ते ९ जानेवारी २०२२ या दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेअंतर्गत क्रिकेट, टेबल-टेनिस व बॅडमिंटन स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किटेक्ट महाराष्ट्र चॅप्टरच्या कोल्हापूर सेंटरला या स्पर्धांचे यजमान मिळाले आहे. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, छतीसगड, झारखंड, तेलंगणा, आसाम व जम्मू-काश्मीर या राज्यांमधील ४०० आर्किटेक्ट खेळाडू सहभागी असणार आहेत.

गतवर्षी बेंगलोरमध्ये आयआयएपीएल क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धांअंतर्गत झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे भारतातील वास्तूविशारदांची शिखर संस्था असलेल्या दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किटेक्टने यंदाच्या आयआयएपीएल क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मान महाराष्ट्राला देत असल्याचे जाहीर केले. यानंतर दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किटेक्ट महाराष्ट्र चॅप्टरच्या कोल्हापूर सेंटरने स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिखर संस्थेकडून यजमानपद मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. स्पर्धा आयोजनासाठी लागणारे क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल-टेनिसची चांगली मैदाने असल्याची माहितीही शिखर संस्थेला दिली.

स्पर्धांच्या चोख नियोजनासाठी कोल्हापूर सेंटरने ७ समित्यांचीही तयार केल्या आहेत. या समित्यांनी विविध राज्यांमधून येणाऱ्या क्रीडा संघामधील खेळाडूंच्या राहण्या-जेवणाची सोय केली आहे. त्यासाठी तब्बल ५० ते ६० लाख रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. हा खर्च स्पर्धांसाठी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कंपन्या व संघांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवेशिकांमधून केला जाणार आहे. तसेच ज्या मैदानांवर स्पर्धा होईल, तेथेच खेळाडूंना चहा, नाष्टा व दुपारचे जेवण देण्याचे नियोजन केले आहे. तसेच स्पर्धांसाठी नियोजित केलेली मैदाने सर्व बाजूंनी सुसज्ज करुन देशातून येणाऱ्या खेळाडूंचे कोल्हापूरी पद्धतीने स्वागत करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

अपेक्षित धरला आहे. हा खर्च स्पर्धांसाठी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कंपन्या व संघांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवेशिकांमधून केला जाणार आहे. तसेच ज्या मैदानांवर स्पर्धा होईल, तेथेच खेळाडूंना चहा, नाष्टा व दुपारचे जेवण देण्याचे नियोजन केले आहे. तसेच स्पर्धांसाठी नियोजित केलेली मैदाने सर्व बाजूंनी सुसज्ज करुन देशातून येणाऱ्या खेळाडूंचे कोल्हापूरी पद्धतीने स्वागत करण्याचे नियोजन केले जाणार आहे. चौकट : दोन डोस घेतलेले खेळाडूच स्पर्धेत खेळतील.

ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर शासनाने जे निर्देश लागू केले आहेत, त्याच्या आधीन राहून सर्व स्पर्धेचे आयोजन होईल. शिवाय ज्या खेळाडूंनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्याच्याकडील प्रमाणपत्र सक्तीने पाहिले जाईल. ज्या खेळाडूंकडे लसीचे प -माणपत्र असणार नाही, त्यांना कोणत्याही सबबीवर स्पर्धेत सहभागी करून घेतलेजाणार नाही.

– विजय कोराणे, चेअरमन दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किटेक्ट महाराष्ट्र चॅप्टरच्या कोल्हापूर सेंटर

Related Stories

जिल्हयात कोरोनाचा उद्रेक सुरूच

Abhijeet Shinde

वाई तालुक्यातील शिरगाव येथील केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

मुख्यमंत्री सरकार नाही तर, कार चालवतात; जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल

Abhijeet Khandekar

बाहेरून आलेल्यांनीच सातारा शहरात आणला कोरोना

Patil_p

शियेत आणखी एक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

”अन्यथा हेच तरुण तुमच्या गळ्याला फास लावतील”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!