- महाराष्ट्रात मागील 24 तासात 3181 रुग्ण कोरोनामुक्त!
ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असला तरी महाराष्ट्रासाठी एक चिंतेची बाब आहे. कारण देशातील एकूण रुग्ण संख्येच्या 25 % रुग्ण हे केवळ एकट्या महाराष्ट्रात आहेत. असे असले तरी महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील एकीकडे वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 19 लाख 23 हजार 187 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.28 % आहे.


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 2,889 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 18 हजार 413 वर पोहचली आहे. सध्या 43 हजार 048 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 944 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.52 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 44 लाख 30 हजार 223 नमुन्यांपैकी 20 लाख 18 हजार 413 (13.99 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 97 हजार 941 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 804 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबईत दिवसभरात 394 नवे रुग्ण


मुंबईत कालच्या दिवसात 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 511 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,07,563 वर पोहचली आहे. तर 2,89,811 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 07 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,326 इतकी आहे. सद्य स्थितीत 5 हजार 520 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.