Tarun Bharat

देशातील चित्रपटगृह 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली देशभरातील चित्रपटगृह 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

जावडेकर म्हणाले, गेल्या सात महिन्यांपासून देशातील चित्रपटगृह बंद आहेत. ती आता 15 ऑक्टोबरपासून उघडतील. लोकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार केली आहे. त्यानुसार 50 टक्के आसन क्षमतेसह चित्रपटगृह उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच मास्क घालणे आणि प्रेक्षकांमध्ये आसन अंतर ठेवणे बंधनकारक असेल.

चित्रपटगृहांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रेक्षकांचा संपर्क क्रमांक घेणे, थर्मल स्क्रिनिंग करणे, तसेच एन्ट्री-एक्झिट पॉईंट आणि कॉमन एरियात हँड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. 

Related Stories

दिल्लीत दिवसभरात 100 नवे कोरोना रुग्ण; तर एकही मृत्यू नाही

Tousif Mujawar

श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

दुसऱया लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही!

Patil_p

सुरक्षा पथकावर बारामुल्लात ग्रेनेड हल्ला

Patil_p

‘आपल्या’ विजेवर चालताहेत ई रिक्षा

Patil_p

UNO : ”मोदींच्या भाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत”

Archana Banage
error: Content is protected !!