Tarun Bharat

देशातील जागतिक दर्जाच्या पहिल्या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम, आदिवासींच्या योगदानाचा गौरव

भोपाळ / वृत्तसंस्था

जागतिक दर्जाचे भारतातील पहिले रेल्वेस्थानक असा ज्याचा उल्लेख केला जातो, त्या अत्याधुनिक ‘राणी कमलापती’ रेल्वेस्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पूर्वीच्या जुन्या रेल्वे स्थानकाचा जीर्णोद्धार करुन हे नवे स्थानक निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी 450 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून हे आधुनिकीकरण 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आले.

पूर्वी या स्थानकाचे नाव हबीबपूर स्थानक असे होते. या स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात आल्यानंतर गोंडवन भागातील इतिहासप्रसिद्ध आदिवासी राणी कमलापती यांचे नाव या स्थानकाला देण्यात आले आहे. या स्थानकाचे नाव बदलावे अशी विनंती मध्यप्रदेश सरकारने केंद्र सरकारला केली होती. ती मान्य करत सोमवारी हे नवे नामकरण करण्यात आले. हे केवळ रेल्वे स्थानक नसून ते वाहतुकीचे बहुउपयोगी आणि बहुविध केंद्र असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

राणी कमलापती कोण होत्या?

राणी कलमलापती या भोपाळच्या शेवटच्या हिंदू सत्ताधीश होत्या. त्यांचे राज्य.  अफगाणी हल्लेखोर दोस्त मोहम्मद याने फसवणुकीच्या मार्गाने आपल्या ताब्यात घेतले. राणी कमलापती यांनी प्रतिकार केला तथापि, त्यांचे सामर्थ्य तोकडे पडले. पराभव समोर दिसू लागल्यानंतर त्यांनी आपली विटंबना टाळण्यासाठी जलसमाधी घेऊन प्राणत्याग केला. याला उत्तर भारतात जलजौहार अशी संज्ञा आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी समाजांमध्ये आजही त्यांचा प्राणत्याग अभिमानाचा आणि प्रेरणादायी विषय आहे. त्यांचे नाव अत्याधुनिक रेल्वेस्थानकाला देऊन त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतला, अशी माहिती या राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पत्रकारांना दिली.

सर्वात आधुनिक स्थानक

राणी कमलापती रेल्वेस्थानक हे भारतातील सर्वात आधुनिक रेल्वेस्थानक आणि वाहतूक केंद्र आहे. या स्थानकावर विमानतळासारख्या सोयी सुविधा आहेत. केवळ रेल्वेच नव्हे तर बस आणि ट्रक वाहतुकीचेही ते केंद्र आहे. रेल्वे, बस आणि ट्रक वाहतुकीची सुविधा एकाच स्थानी असणारे ते भारतातील पहिले रेल्वेस्थानक आहे, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. याच्या निर्मितीला 450 कोटी रुपये खर्च आला असून येथील प्लॅटफॉर्म्सची संख्या सर्वाधिक आहे. एकाचवेळी 10 हजारांहून अधिक प्रवाशांची सोय आहे. शिवाय मालवाहतुकीचीही सर्वात मोठी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. या स्थानकामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, राजस्थान, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र आदी राज्यांना प्रवासी आणि मालवाहतुकीकरिता लाभ होणार आहे.

राष्ट्राच्या निर्माणात आदिवासींचे योगदान अतुलनीय

देशनिर्मिती आणि त्यापूर्वीचा देशाचा स्वातंत्र्यसंग्राम यात आदिवासी समाजाचे योगदान अतुलनीय आहे, असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी कमलापती रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करताना काढले आहेत. सोमवारी आदिवासी समाजातील थोर स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांची जयंती होती. या जयंतीचे औचित्य साधून या स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. मुंडा यांच्या जयंतीदिवशी राणी कमलापती स्थानकाचे उद्घाटन केल्याने आदिवासी समाजाच्या राष्ट्रीय योगदानाचा योग्य तो सन्मान झाला आहे. काँग्रेसच्या काळात आदिवासी समाजाच्या प्रगतीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र भाजप सरकारने या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक भरीव योजना क्रियान्वित केल्या आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

पायाभूत सुविधा विकासाचा मानबिंदू

ड राणी कमलापती स्थानक भारताच्या पायाभूत विकासाचा मानबिंदू

ड भारतातील सर्वात आधुनिक रेल्वेस्थानक आणि माल वाहतूक केंद्र

ड 450 कोटी रुपयांचा खर्च, जर्मनीच्या धर्तीवर स्थानकाची बांधणी

ड एकाचवेळी हजारो प्रवाशांची सोय, प्लॅटफॉर्म्सची सर्वाधिक संख्या

ड तीन वर्षांच्या अल्प कालावधीत विक्रमी वेगाने केले आधुनिकीकरण

Related Stories

४४ नक्षलींचं आत्मसमर्पण

Archana Banage

शेअर बाजारात पुन्हा ‘ब्लॅक मंडे’

Patil_p

औषधे, ऑक्सिजन, लसी पुरवठय़ावर भर द्या !

Patil_p

कोरोना निर्देशांचे पालन करु, यात्रा चालू राहणार

Amit Kulkarni

पंजाब : आरोग्य आणि शिक्षण विभागात होणार 4245 पदांची भरती

Tousif Mujawar

राजस्थान : जयपूर विमानतळावर 14 प्रवाशांकडून 32 किलो सोने जप्त

Tousif Mujawar