Tarun Bharat

देशातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट कायम

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशातील नकवीं कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 13,166 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 302 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तसेच 26,988 रुग्ण बरे झाले आहेत. मंत्रालयाच्या अहवालानुसार, सध्या देशात 1,34,235 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच देशात आतापर्यंत 5,13,226 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारी पहिली, तर हे स्पष्ट होतं की ओमिक्रॉनची लाट देशात कमकुवत झालीय. काल (गुरुवार) भारतात 15,102 नवीन रुग्ण आढळले आणि 278 लोकांचा मृत्यू झाला. आज आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर असं सांगण्यात आलंय की, केरळमध्ये देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. जिथं 42473 लोक कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (14242) आणि तामिळनाडू (9440) यांचा क्रमांक लागतो. गेल्या 24 तासांत केरळमध्ये सर्वाधिक 52 जणांचा मृत्यू झालाय.

Related Stories

जयपूर हादरवण्याचा कट उधळला

Amit Kulkarni

म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग, तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा आजार नाही : डॉ. गुलेरिया

Abhijeet Shinde

पंजाबमधील आमदारांशी राहुल गांधी करणार आज चर्चा!

Rohan_P

पंतप्रधान मोदींना सुरक्षा देणार नवी कार

Patil_p

परमबीर सिंग यांच्याकडून अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी

Abhijeet Shinde

भारत फिलिपिन्सला करणार ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची निर्यात

datta jadhav
error: Content is protected !!