Tarun Bharat

देशातील पहिले आदर्श गाव टेकुलोडु

Advertisements

ग्रामस्थ स्वतःच्या आत्मनिर्भरतेची कथा सांगण्यास तयार

गावात येणाऱयांनीही काही तरी शिकवून जावे हीच अट

आंध्रप्रदेशच्या अनंतपूर जिल्हय़ातील टेकुलोडु या गावाने आदर्श आणि आत्मनिर्भर होत ‘प्रोटो व्हिलेज’च्या रुपात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अन्न, पाणी, वीज यासारख्या सर्व गरजांसाठी पर्यावरण संरक्षणासह आत्मनिर्भर मॉडेल विकसित करणारे हे देशातील पहिले गाव आहे.

गावातील लोक आत्मनिर्भर होण्याची कथा सांगण्यास तयार असले तरीही येणाऱया व्यक्तीने काहीतरी शिकवून जावे हीच त्यांची अट आहे. पाहुण्याला तेथे 300 रुपये प्रतिदिनाच्या शुल्कावर तेथे राहता येते, पण तेथे काही दिवस थांबून खरोखरच काहीतरी शिकविणाऱया व्यक्तींना पर्यटकांऐवजी प्राधान्य दिले जाते. एखाद्या व्यक्तीला अधिक काळ थांबायचे असल्यास त्याला स्वयंसेवकाच्या रुपात सेवा करावी लागते.

गावाने शिकण्यालाच स्वतःचे उद्दिष्ट केले आहे. हे गाव आज पवनचक्क्यांद्वारे स्वतःच्या गरजेची वीज निर्माण करते. रेन हार्वेस्टिंगद्वारे पाणी वाचविले जाते. शेतीसोबत पशूपालन, मत्स्यपालनही करण्यात येते. सेंद्रीय शेतीसाठी कंपोस्ट आणि वुड काँक्रिट पॅनलद्वारे पर्यावरणस्नेही घरांची निर्मिती करण्यात येते. गावाने पुढील 10 वर्षांच्या वाटचालीचे लक्ष्य निर्धारित केल्याचे प्रोटो व्हिलेजच्या मुख्य संरक्षिका शोभिता यांनी सांगितले आहे.

प्रत्येकाकडून शिक्षणाचे धडे

पर्यावरण संरक्षणामुळे गावातील मुलांना 50 पेक्षा अधिक पक्ष्यांची आणि झाडांची नावे तोंडपाठ आहेत, कारण हा त्यांच्या दिनचर्याचा भाग आहे. इंग्रजीत संवाद साधू शकणारी मुले खुल्या शाळा व्यवस्थेत पाहुणे, स्वयंसेवकांकडून कुठल्याही विशेष वर्गात विभागून न जाता शिकतात. तर शालेय शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय बोर्ड आयजीसीएससीची निवड करण्यात आली आहे.

Related Stories

केंद्र सरकारला लसीकरणावरून ‘डोस’

Patil_p

शोपियां चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

कोरोनाग्रस्तांचे मृतदेह गंगानदीत ?

Patil_p

स्वित्झर्लंड न्यायालयाचा प्रकाश हिंदुजांना झटका

Amit Kulkarni

व्यंकय्या नायडूंच्या ‘ट्विटर’ अकाउंटला पुन्हा ब्लू टिक

datta jadhav

नीट-पीजी परीक्षा चार महिने लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!