Tarun Bharat

देशातील पहिल्या खासगी रॉकेट लाँचपॅडचे उद्घाटन

मिशन कंट्रोल सेंटरचाही शुभारंभ ः लवकरच होणार ‘अग्निबाण’चे प्रक्षेपण

वृत्तसंस्था  / श्रीहरिकोटा

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या शासकीय रॉकेट लाँच पॅडवरून आता केवळ रॉकेट प्रक्षेपित होणार नाहीत. तर खासगी लाँच पॅडद्वारेही प्रक्षेपण मोहीम साकारली जाणार आहे. देशातील पहिला खासगी रॉकेट लाँचपॅड आणि मिशन कंट्रोल सेंटरचे उद्घाटन झाले आहे. लवकरच येथून ‘अग्निबाण’ नावाचा खासगी रॉकेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी श्ा़खाrहरिकोटा येथे निर्मित देशातील पहिला खासगी लाँचपॅड आणि मिशन कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले आहे. हा लाँचपॅड आणि कंट्रोल सेंटर खासगी स्पेस कंपनी अग्निकुल कॉसमॉसने तयार केले आहे. यात अग्निकुलच्या टीमला इस्रोच्या वैज्ञानिकांनी मदत केली आहे. अग्निबाण रॉकेटही अग्निकुल कॉसमॉस कंपनीने तयार केला आहे. या लाँचपॅडवरून अग्निबाणचे पहिले प्रक्षेपण होणार आहे.

अग्निकुल एक स्टार्टअप असून ते काही अंतराळ तंत्रज्ञांनी मिळून निर्माण केला आहे. यात अनेक दिग्गज उद्योगपतींनी गुंतवणूक केली आहे. यातील सर्वात मोठे नाव आनंद महिंद्रा यांचे आहे. त्यांनी अग्निबाण रॉकेटसाठी 80.43 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याचबरोबर पाई व्हेंचर्स स्पेशल इन्व्हेस्ट आणि अर्थ व्हेंचर्सने देखील या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे.

अग्निकुल कॉसमॉसची सुरुवात 2017 मध्ये झाली होती. ही कंपनी चेन्नईत स्थापन करण्यात आली होती. श्रीनाथ रविचंद्रन, मोइन एसपीएम आणि आयआयटी मद्रासचे प्राध्यापक एस.आर. चक्रवर्ती यांनी मिळून हा स्टार्टअप सुरू केला होता. अग्निकुल सध्या एक छोटा खासगी रॉकेट अग्निबाण तयार करत आहे. हे लाँच व्हेईकल 100 किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत स्थापित करण्यास सक्षम आहे. यात प्लग-अँड-प्ले इंजिन कॉन्फीग्युरेशन आहे.

अग्निकुल कॉसमॉसने स्वतःच्या ग्राउंड टेस्टिंगला कोरोना संकटकाळात रोखले होते. कोरोना महामारीदरम्यान देशात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. तर अग्निबाण रॉकेटमध्येही लिक्विड ऑक्सिजनची गरज इंधन म्हणून लागते.

Related Stories

जंगलात चित्रिकरणाचा अनुभव काही औरच

Patil_p

भारतीय विद्यार्थ्याला नासाच्या स्पर्धेत विजेतेपद

Patil_p

बिहार निवडणूक : तिकीट घेण्यासाठी आलेल्या नेत्याच्या गाडीतून 75 लाखांची रोकड जप्त

datta jadhav

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Archana Banage

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांना झटका

Patil_p

गगनयान मोहिमेत ग्रीन प्रोपल्सनचा वापर

Patil_p