Tarun Bharat

देशातील प्रत्येक व्यक्तीने कायदा समजून घेणे गरजेचे : न्यायाधीश सी. एम. जोशी

प्रतिनिधी /बेळगाव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली. त्या घटनेवरच आज देशाचा सर्व कारभार चालतो. ही घटना देशातील गरीब, दीन, दलित यांच्यासह सर्वांना समान न्याय देते. त्यानुसारच कायदे आहेत. त्या कायद्याचा आधार प्रत्येकाला घेता येतो. तेंव्हा प्रत्येकानेच घटना समजून घेणे गरजेचे असल्याचे मत मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी व्यक्त केले.

बेळगाव बार असोसिएशन तसेच जिल्हा कायदा सेवा प्राधिकार यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बार असोसिएशनचे नुतन अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी हे होते.

प्रारंभी जनरल सेपेटरी गिरीश पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्य न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ट वकील शरद मुंडरगी व इतरांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव विजय देवराज अर्स व इतर न्यायाधीश उपस्थित होते.

प्रास्ताविक जाईंट सेपेटरी ऍड. बंटी कपाई यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर यांनी आभार मानले. यावेळी मोठय़ा संख्येने वकील उपस्थित होते.

Related Stories

शहरात ठिकठिकाणी चक्काजाम

Amit Kulkarni

खानापूर बेळगाव राष्ट्रीय मार्गावरही आता नाकेबंदी

Tousif Mujawar

ब्रिटिशकालीन कार्यालयाला कला शिक्षकांनी दिले नवे रूप

Amit Kulkarni

घरफोडय़ांच्या सत्राने खळबळ

Patil_p

भाविकांना करता येणार काशी दर्शन

Patil_p

कृष्णा-मलप्रभा नदीवर धोकादायक पाणीपातळी दाखविणारी यंत्रणा

Patil_p