Tarun Bharat

देशातील लॉकडाऊन वाढवण्याची आयसीएमआरची केंद्राकडे शिफारस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन काही काळ सुरू ठेवावा, अशी शिफारस इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने केंद्र सरकारकडे केली आहे.

देशात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागात एक तृतीयांश लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती माता यांना या विषाणूचा धोका अधिक असून, पुढील काही महिने हा धोका राहील. त्यामुळे कोरोनाशी लढा देण्यासाठी अजून काही काळ देशात लॉकडाऊन सुरू ठेवावा, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

भारतातील लोकांच्या कोरोनाशी मुकाबला करण्याच्या प्रतिकारशक्तीचा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरने 83 जिल्ह्यातील 26 हजार 400 लोकांचे सिरॉलॉजीकल सर्व्हेक्षण केले. त्यानंतर या संस्थेने केंद्राकडे ही शिफारस केली आहे.

Related Stories

गंभीर आजारी मुलांना सर्वप्रथम लस

Patil_p

सातारकरांसाठी समाधानकारक सोमवार

Archana Banage

सीमाप्रश्नी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

Omkar B

अन्य देशांच्या धर्तीवर दिलासा पॅकेज : सीतारामन

Patil_p

प्रथम टप्प्यात 60 टक्क्यांहून अधिक मतदान

Amit Kulkarni

शेफ अन् कुकचे गाव

Patil_p