Tarun Bharat

देशातील 42 हजार 297 कोरोनाबाधित पूर्ण बरे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी देशभरात रूग्ण बरे होण्याचा टक्काही वाढला आहे. एकुण रूग्णसंख्या एक लाख 6हजार 750 झाली आहे.आतापर्यंत तब्बल 42 हजार 297 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. यातील 61 हजार 149 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन हजार 303 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी बुधवारी दिली.

देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जारी केला होता. तेव्हा रूग्ण बरे होण्याचा टक्का हा केवळ 7.1 इहोता.आता तो 39.62 टक्के आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव
अग्रवाल यांनी सांगितले. अन्य 15 देशांमध्ये एकुण कोरोनाग्रस्तांपैकी  83 टक्के मृत्यू होत आहेत. भारतातील रूग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. जगातील अन्य देशांचा विचार करता भारताची लोकसंख्या अधिक असूनही स्थिती अतिशय चांगली आहे, असेही ते म्हणाले.  लोकहिताचा विचार करूनच 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. लॉकडाऊनमधील नियम शिथिलतेबाबत राज्यांबरोबर विचारविनमय करून सूचना दिल्या जात असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी यावेळी सांगितले.

Related Stories

हरियाणा : 28 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम; काही निर्बंधांमध्ये सूट

Tousif Mujawar

टीएनवर हिंदी लादल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा द्रमुकचा इशारा

Patil_p

‘डब्ल्यूएफआय’ची बैठक चार आठवडे लांबणीवर

Patil_p

मतदारयादी-आधार लिंक विरोधी याचिकेवर होणार सुनावणी

Patil_p

हरियाणात शेतकऱ्यांचे ‘टोल फ्री’ आंदोलन

datta jadhav

केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या महत्वाची बैठक

Patil_p