Tarun Bharat

देशात उच्चांकी रुग्णवाढ

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 40 हजार 953 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यंदाच्या वर्षातील कोरोनाची ही उच्चांकी रुग्णवाढ आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 15 लाख 55 हजार 284 वर पोहचली आहे. शुक्रवारी 188 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 558 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 4 कोटी 20 लाख 63 हजार 392 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

शुक्रवारी 23,653 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 07 हजार 332 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 2 लाख 88 हजार 394 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 23 कोटी 24 लाख 31 हजार 517 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 60 हजार 971 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.19) करण्यात आल्या.

Related Stories

उत्तराखंड : भाजप आमदार विनोद चमोली कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

कोरोना स्थितीवर चर्चेसाठी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक

Patil_p

पीएमओ अन् महत्त्वाच्या मंत्रालयांमध्येच हेरगिरी

Omkar B

युवकाने बनविले पीक संरक्षण यंत्र

Patil_p

कोरोना उपचारासाठी एनपीएसमधून पैसे काढणे शक्य

Patil_p

रुग्णवाढ धक्कादायक

Patil_p
error: Content is protected !!