नवी दिल्ली : देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 78 वर पोहोचली आहे. गुरुवारी दिल्लीत ओमिक्रॉनचे 4 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 10 वर गेल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. 10 पैकी 1 जण बरा होऊन घरी गेला आहे. 9 जणांवर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱयांपैकी कोणत्याही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही. गुजरातमध्ये ओमिक्रॉनचा पाचवा बाधित आढळून आला आहे. मेहसाणा जिल्हय़ात एका 43 वषीय महिलेला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तिला वडनगर येथील जीएमईआरएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.


previous post