Tarun Bharat

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 23 हजार 077 वर, तर कोरोनामुक्तीचे प्रमाण 20.57 टक्के

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 684 कोरोनाच्या  रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 23 हजार 077 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 718 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 491 रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4 हजार 749 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.


ते म्हणाले, 80 जिल्ह्यात गेल्या चौदा दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही आहे. देशात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच 20.57 टक्के आहे. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


अहमदाबाद, सुरत, चेन्नई, हैदराबाद येथे केंद्रीय पथक जाणार. तसेच धारावीत केंद्राच्या पथकाने पाहणी करून रिपोर्ट दिले आहेत. या रिपोर्टनुसार झोपडपट्टीतील शौचालयाच्या प्रश्नामुळे धोका वाढला आहे. त्यामुळे धारावीमध्ये फिरत्या शौचालयाची सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आली आहे. असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.  

Related Stories

सेमीकंटक्टर, डिस्प्ले उत्पादनासाठी मोठय़ा सवलती देणार

Patil_p

मुन्ना महाडिकांच वक्तव्य बंटी पाटलांना उद्देशूनचं- हसन मुश्रीफ

Abhijeet Khandekar

देशात 50,357 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका!

Patil_p

मागील 24 तासात 3.47 लाख नवे बाधित

datta jadhav

व्हिलचेअरवर फिरणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Archana Banage