Tarun Bharat

देशात कोरोनाचा नवा म्युटेंट

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या म्युटेंटमुळे परिस्थिती आधीच नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यातच आता कोरोनाच्या ‘N440K’ या नव्या म्युटेंटची भर पडली. हा स्ट्रेन 10 पट अधिक धोकादायक असल्याचे संशोधकांकडून सांगण्यात येते. 

एका अहवालानुसार, 26 एप्रिल ते 2 मे दरम्यान देशात 26 लाख नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आणि 23,800 रुग्ण दगावले. याच काळात संशोधकांनी कोरोनाच्या ‘N440K’ या नव्या म्युटेंटचा शोध लावला. हा म्युटेंट इतर म्युटेंटपेक्षा 10 ते 1000 पट जास्त संसर्गजन्य आहे, ज्यामुळे देशाच्या काही भागात दुसरी लाट शिखरावर पोहोचली आहे. 

आंध्रप्रदेशातील करनुल शहरात हा म्युटेंट प्रथम सापडला. आंध्र आणि तेलंगणासह देशाच्या अनेक भागात आता हा म्युटेंट वेगाने पसरत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान आंध्र आणि तेलंगणामध्ये नोंदवलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे याच म्युटेंटमुळे झाली असल्याचा संशोधकांचा दावा आहे. 

Related Stories

हिमाचल प्रदेश : 4 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार सर्व शाळा

Tousif Mujawar

नोव्हेंबर महिन्यामध्ये 23 लाख जणांना रोजगार

Patil_p

मैत्रीपेक्षा महत्त्वाचे काहीच नाही!

Patil_p

महाराष्ट्र सत्तासंघर्ष ; २७ सप्टेंबरला पुढची सुनावणी

Archana Banage

शिवसेना कोणाची? 12 डिसेंबरला सुनावणी

datta jadhav

अरुणाचल प्रदेशात जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar
error: Content is protected !!