Tarun Bharat

देशात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांपार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

देशात मागील 24 तासात 4630 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख   328 वर पोहचली असून, मृतांची संख्या 3156 एवढी आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

सध्या देशात 57 हजार 939 ॲक्टिव कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 39 हजार 233 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 38.39 टक्के आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांचे प्रमाण 7.1 आहे. स्पेनमध्ये हे प्रमाण 494, इटलीत 373, ब्रिटनमध्ये 361 आहे. जागतिक पातळीवर मात्र हे प्रमाण प्रति लाख 60 एवढे आहे.

Related Stories

शाळा सुरू न करणे धोक्याचे

Patil_p

चीनच्या माघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण

Patil_p

देशात 2.99 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

गूगल भारतात करणार 75 हजार कोटींची गुंतवणूक : सुंदर पिचाई यांची घोषणा

Tousif Mujawar

‘स्पुटनिक व्ही’ लसीचे रशियात साईड इफेक्ट

Patil_p

अनलॉक-३ : ‘या’ वाहतुकीवरील बंदी हटवा; केंद्राचे राज्यांना आदेश

Archana Banage