Tarun Bharat

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

Advertisements

नवी दिल्ली /प्रतिनिधी

देशात करोना संसर्गाचा वेग कमी झालेला दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होत आहे. सध्या देशात फक्त २ लाख ३० हजार सक्रिय रुग्ण आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये १८,१६६ नवीन करोना बाधितांची नोंद झाली. तर २१४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, गेल्या २४ तासांमध्ये २३६२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, देशात शनिवारी १८,१६६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २३,६२४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर शनिवारी दिवसभरात २१४ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर करोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी ३९ लाख ५३ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ५० हजार ५८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३२ लाख ७१ हजार लोक बरे झाले आहेत. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे दोन लाख आहे. एकूण २ लाख ३० हजार ९७१ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

Related Stories

राजकारण प्रवेशावरून तळय़ात-मळय़ात सुरूच

Patil_p

गोव्यात काँग्रेस स्थिर सरकार स्थापन करेल – पी चिदंबरम

Sumit Tambekar

देशात 4.72 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

आझम खान यांना मोठा झटका

Patil_p

मध्यप्रदेशात भाजपचा एकहाती विजय

Patil_p

हरियाणातील 19 जिल्ह्यात 514 नवे कोरोना रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!