Tarun Bharat

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. भारतातही या नवख्या व्हेरियंटने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. तर केंद्र सरकारने सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्य मंत्रालयाकडून प्रत्येक पालिका आय़ुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

देशात गेल्या २४ तासांत २२ हजार ७७५5 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ८ हजार ९४९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. देशभरात एकूण ४०६ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १ लाख ४ हजार ७८१ सक्रिय रुग्ण आहेत.तर रिकव्हरी रेट ९८.३२ टक्के आहे.

देशात ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. यातील एक व्यक्ती पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील होती.तर अन्य रुग्ण राजस्थानातील होता. सध्या देशात १ हजार४३१ ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. याआधी ही आकडेवारी१००२ होती. ओमिक्रॉन झपाट्याने परसत असल्याचं स्पष्ट झालंय. याआधी दिल्लीत सर्वाधिक रुग्ण होते. मात्र, आता महाराष्ट्रात ४५४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर राजधानी दिल्लीत ३५१ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी गेल्या २४ तासाची आहे. तर ७० टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंट असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या अहवालातून समोर आलं आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात राज्यांना सुचना जारी केल्या आहेत.

Related Stories

महाराष्ट्र : 4,122 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 %

Rohan_P

पुण्यातील मार्केटयार्ड उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद

prashant_c

…यासाठी विचारवंतांनी एका व्यासपीठावर यावे

Rohan_P

Anil Deshmukh case: ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत- शरद पवार

Abhijeet Shinde

गुजरातमधील प्रकल्पांना मोदींकडून हिरवा झेंडा

Patil_p

75 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण

Patil_p
error: Content is protected !!