Tarun Bharat

देशात कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 439, तर 377 बळी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1076 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 439 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 377 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 38 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 1306 रुग्ण बरे झाले असते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली. 


ते म्हणाले, कॅबिनेट सचिवांनी आज राज्य सरकारसोबत चर्चा केली. यामध्ये हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनबाबत आढावा घेण्यात आला. या अंतर्गत जिल्ह्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाईल. यामध्ये हॉटस्पॉट जिल्हे, नॉन हॉटस्पॉट जिल्हे आणि ग्रीन झोन जिल्हे असे वर्गीकरण असणार आहे.

सध्या आपल्या देशात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला नाही आहे. मात्र, देशात 170 जिल्हे कोरोना हॉटस्पॉट आहेत. असं ही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्यांसाठी कोविड सेंटर आणि गंभीर रुग्णांसाठी कोविड रुग्णालय असणार आहे, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.


गृहमंत्रालयाकडून जी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे, तिचा योग्य प्रमाणात अवलंब करणे महत्त्वाचे आहे. आणि तसे झाले नाही तर एखादी चूक देखील अख्ख्या देशाला महागात पडू शकते.

तसेच संवेदनशील नसलेल्या काही भागात थोडी सूट देण्यात आली आहे. मात्र, थोडी सूट दिली असली तरी लॉक डाऊन कायम राहणार आहे. त्याचबरोबर सूट दिलेल्या भागात सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य आहे. असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 


वटवाघुळामध्ये ही कोरोनाचा विषाणू असू शकतो. चीनमध्ये केलेल्या रिसर्च नुसार, कोरोना विषाणू वटवाघुळामधून आला असेल किंवा पेंगुलीन नावाच्या जनवरातून माणसांमध्ये आला असेल. अशी माहिती आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिली. 

Related Stories

चीनच्या Weibo, Baidu Search अ‍ॅपवरही भारताने घातली बंदी

datta jadhav

हवाई दलासाठी नवीन 56 विमानांची खरेदी

Patil_p

लाल महाल चित्रीकरणाप्रकरणी वैष्णवी पाटीलचा माफीनामा

datta jadhav

किरकोळ महागाई दर फेब्रुवारीत 6.44 टक्के

Patil_p

कंगनाच्या ऑफिसवर मुंबई पालिकेचा हातोडा

Tousif Mujawar

भ्रष्टाचाराविरोधात सर्वोच्च न्यायालय पंतप्रधानांसमवेत

Patil_p