Tarun Bharat

देशात कोरोना लाट तीव्र ! गेल्या २४ तासांत चार हजारपेक्षा अधिक बळी

ऑनलाईंन टीम / नवी दिल्ली


देशातील कोरोनाची लाट थांबता थांबेना अशी स्थिती कायम आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कोरोना बळींच्या संख्येत मात्र कमी होत नसल्याचे चित्र स्पष्ट आहे.

देशात दररोज सुमारे साडेतीन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांतील मृतांचा आकडा चार हजार सत्याहत्तरवर पोहोचला आहे. हा आकडा चिंताजनक आहे. तर देशभरात दिवसात आढळून आलेली रुग्ण संख्या तीन लाख अकरा हजार झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या तीन लाख बासष्ट हजार झाली आहे.

कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक झाली असल्याने ती अधिक दिलासादायक बाब आहे. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४,०७७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Related Stories

दिल्ली : एम्स रुग्णालयात आग; जीवितहानी नाही

Tousif Mujawar

खासदारांच्या पीएची करामत, अन् ‘हे’ काम झाले रद्द

Archana Banage

देशव्यापी निर्बंधांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ

Amit Kulkarni

साताऱयात सर्वत्र नाकाबंदी

Omkar B

पाकिस्तानी ड्रोनकडून चारवेळा घुसखोरी

Patil_p

‘या’ कारणामुळे गूगलने घनी सरकारची ई-मेल अकाउंट केली लॉक

datta jadhav