Tarun Bharat

देशात डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर; ४ महिन्यांच्या उच्चांकावर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट वेगाने फैलावत आहे. याचा थेट परिणाम देशाच्या रोजगार क्षेत्रावर झाला असून हाताला काम मिळावे यासाठी देशातील युवक शोधात आहे. भारत हा युवकांचा देश म्हणुन ओळखला जातो आहे. पण याच युवकांवर आता कोरोनामुळे नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. 2021 डिसेंबरमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन जबाबदार असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात जारी केलेल्या रीपोर्टमध्ये म्हटले आहे की अनेक राज्यांमध्ये ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर देशातील आर्थिक व्यवहार आणि ग्राहकांची मानसीकता प्रभावित झाली आहे. आज जाहीर झालेल्या CMII रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर वाढून ७.९ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो नोव्हेंबरमध्ये ७.९ टक्के होता, हा ऑगस्टमधील ८.३ टक्क्यांनंतरचा हा उच्चांक आहे.

विशेष म्हणजे, मे 2021 मध्ये भारतात सर्वाधिक बेरोजगारीचा दर नोंदवला गेला. या महिन्यात तो 11.84 टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मुंबईस्थित CMIE कडून बेरोजगारीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते, कारण सरकारकडून मासिक आकडेवारी जाहीर केली जात नाही.

Related Stories

मिरजेत मराठी रंगभूमी दिन साजरा

Archana Banage

कुस्तीशौकिनांना हुरहूर राहुलच्या हुकलेल्या विजयाची

Patil_p

सवयभानकडून साताऱ्यात 20 हजार 777 घरांची तपासणी

Archana Banage

ऍमेझॉन’ला 200 कोटी दंड भरावा लागणार

Patil_p

गवडीच्या रिक्षाचालकाला माणुसकी भोवली

Patil_p

येडियुराप्पा स्वतःहून विलगीकरणात

Patil_p