Tarun Bharat

देशात दैनंदिन रुग्णसंख्येने ओलांडला 3.5 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात दैनंदिन रुग्णसंख्येने 3.5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.मागील 24 तासात 3 लाख 52 हजार 991 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनचा दैनंदिन रुग्णवाढीचा हा सर्वात मोठा आकडा आहे. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. रविवारी 2 लाख 19 हजार 272 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2812 रुग्णांचा मृत्यू झाला. 

देशात आतापर्यंत 1 कोटी 73 लाख 13 हजार 163 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 43 लाख 04 हजार 382 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 28 लाख 13 हजार 658 रुग्ण उपचार घेत असून, 1 लाख 95 हजार 123 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 14 कोटी 19 लाख 11 हजार 223 जणांना लसीकरण करण्यात आले.

देशात आतापर्यंत 27 कोटी 93 लाख 21 हजार 177 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 14 लाख 02 हजार 367 कोरोना चाचण्या रविवारी (दि.25) करण्यात आल्या. 

Related Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता साधणार जनतेशी संवाद

Tousif Mujawar

‘यशवंत सिन्हा’ यांच्यामुळे मागे हटले विरोधी पक्ष

Patil_p

चिपळूणच्या आंदोलनाने महाविकास आघाडीची धावपळ

Patil_p

लडाख सीमेवर आणखी भारतीय सैनिक नियुक्त

Patil_p

जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही ; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Archana Banage

देशात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांपार

datta jadhav