Tarun Bharat

देशात नवीन राष्ट्रीय बँकेची स्थापना : सीतारामन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पायाभूत सुविधा आणि विकासाशी संबंधित कामांसाठी निधी गोळा करण्यासाठी नवीन राष्ट्रीय बँक स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बँकेचे नामकरण ‘विकास वित्त संस्था’ असे करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर सीतारामन यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. सीतारामन म्हणाल्या, देशातील मोठ्या प्रकल्पांसाठी निधी गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र राष्ट्रीय बँक स्थापन करण्यात येणार आहे. कॅबिनेटने याला मंजुरी दिली असून, त्यासाठी एका बोर्डची स्थापना केली जाईल. सरकारकडून सुरुवातीला या बँकेला 20 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.  

तसेच बँकांच्या खासगीकरणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, केंद्र सरकार सर्व सरकारी बँकांचे खासगीकरण करणार नाही. स्टेट बँकेसारख्या इतर बँका बनव्यात, यासाठीच या नवीन बँकेची स्थापना करण्यात येत आहे.

Related Stories

“सरसकट होलसेलमध्ये ‘वाय’ सुरक्षा पुरविण्याची मोदी सरकारवर वेळ …”

Abhijeet Khandekar

मथुरा शहरात दोन बांगलादेशींना अटक

Patil_p

भारत-अमेरिकेत उद्या ‘टू प्लस टू’ चर्चा

datta jadhav

आणखी 660 रेल्वे प्रवाशांच्या सेवेत

Patil_p

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; खत दरवाढ अखेर मागे

Archana Banage

अमरिंदर यांच्याकडून मुख्यमंत्री चन्नी लक्ष्य

Patil_p