Tarun Bharat

देशात नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

नवी दिल्ली /प्रतिनिधी

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येतदररोज चढउतार पाहायला मिळत आहेत. रविवारच्या तुलनेत गेल्या २४ कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दरम्यान, सोमवारी देशात मागील २४ तासात नवीन कोरोना रुग्णसंख्येत १० हजारांनी घट झाली. सोमवारी दिवसात ३० हजार ५ ४९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याचवेळी ४२२ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

देशात गेल्या २४ तासात भारतात ३० हजार ५४९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४२२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३८ हजार ८८७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

देशातील आतापर्यंतची आकडेवारी

देशात आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३ कोटी १७ लाख २६ हजार ५०७ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ८ लाख ९६ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख २५ हजार १९५ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. तर देशात सध्याच्या घडीला ४ लाख ४ हजार ९५८ इतके सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ४७ कोटी ८५ लाख ४४ हजार ११४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Related Stories

मशिदीवरचे भोंगे मुलभूत अधिकार नाही

Patil_p

SANGLI; जाडरबोबलाद येथे वाहन चालकाचा ठेचून खून, खुनाचे कारण अस्पष्ट

Rahul Gadkar

बुधवारपासून रात्री बंद राहणार अटल भुयार

Patil_p

लालूंच्या घरासह १५ ठिकाणांवर CBI चे छापे

Archana Banage

नॅशनल कॉन्फरन्सला मोठा झटका

Patil_p

इचलकरंजी आगारात अज्ञातांकडून १३ वाहनांची तोडफोड

Archana Banage